मुंबई (वृत्तसंस्था) तापमान वाढीमुळे होणाऱ्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. अशात उकाड्यामध्ये शीतपेय पिण्याकडे सर्वांचा कल असतो. अशामध्ये आता प्रत्येक घरात वापरल्या जाणाऱ्या लिंबाचे भाव (Lemon Price Hike ) देखील गगनाला भिडले आहेत. राजस्थानमधील (Rajasthan) कोटामध्ये लिंबाचा भाव आजच्या तारखेत पेट्रोल आणि डिझेलपेक्षा महाग झाला आहे. आज 250 ते 280 रुपये किलो भाव झाला आहे.
लिंबू विकत घेण्यासाठी आलेला कोणीही दर ऐकून थक्क होतो आणि लिंबू इतके महाग कसे झाले म्हणून भांडू लागतो. प्रत्येक ग्राहकाला याचे कारण सांगताही येत नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. दरात वाढ झाल्याने लोकांनी लिंबाची खरेदीही कमी केली आहे. फक्त काही लोक लिंबू विकत घेऊ शकतात. लिंबाशिवाय भाजीपाल्यात लेडी फिंगर, लोकी, हिरवी मिरचीचा भावही १५ रुपयांवरून ७० ते ८० रुपयांपर्यंत वाढला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने भाजीपाला महाग झाला आहे, यात शंका नाही. आतापासूनच भाजीपाला महाग होत असल्याने आम्हालाही जास्त पैसे मोजावे लागत असल्याचे भाजीविक्री करणाऱ्या दुकानदारांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर आधी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढायचे, आता भाज्यांचेही भाव वाढल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. तक्रार असली तरी ती कोणाकडे करायची? सर्वसामान्यांचे कोणी ऐकणार नाही. उन्हाळ्यात ऑफिसला जाणारे किंवा रोजंदारीवर काम करणारे लोक सहसा लिंबू सरबत पितात. मात्र लिंबाच्या दरात वाढ झाल्याने लिंबू सरबतच्या दरातही वाढ झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी लिंबू सरबतच्या गाड्या लावणाऱ्यांनी 10 रुपयांऐवजी 15 रुपयांचा ग्लासही केला.