बोदवड (प्रतिनिधी) बोदवड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे सोमवार २७ रोजी आयोजित उद्योगाकडून स्वावलंबनाकडे वाटचाल या कार्यशाळेला विद्यार्थी, शेतकरी व महीलांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेचे उदघाटन अहमदनगर येथील प्रसिद्ध उद्योजक , संशोधक व सल्लागार बायोम टेक्नॉलॉजी चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रफुल्ल गाडगे यांच्या हस्ते, संस्थेचे सचिव श्री. विकासभाऊ कोटेचा यांच्या प्रमूख उपस्थितीत व प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या अध्यक्षतखाली द्वीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी हातात असलेली नोकरी सोडुन स्वतःचा उद्योग यशस्वीपणे सुरू करणारे डॉ.प्रफुल्ल गाडगे यांनी स्वतःच्या जीवनाचा खडतर व प्रेरणादायी प्रवास सांगत विद्यार्थी व शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यात समस्या ओळखून त्याचं समाधान शोधून स्वतःचं स्टार्ट अप कसं सुरु करता येइल याचे सविस्तर मार्गदर्शन त्यांना वेगवेगळे उदाहरण देऊन केले.
यात महिलांच्या समस्या असतील किंवा शेतकऱ्यांच्या असतील, अगदी कुठलीही समस्या असेल त्याचा संधी म्हणुन कसा उपयोग करुन घेता येइल याचे विवीध उदाहरणे देऊन समजाऊन सांगीतले.महिलांनी स्वतःच्या पाक कलेमधून, तसेच स्वतःजवळ असणाऱ्या ईतर वैशिष्ट्यांचा नावीन्यपूर्ण पद्धतीने वापर करून त्याचे पॅकेजिंग व मार्केटिंग त्याच्या विविध गुणधर्म सहित कसं करता येइल याची उत्तम महिती दिली.
समस्या निर्माण झाल्या तरच समाधानासाठी नविन संकल्पना जन्माला येतात. त्याचा पाठपुरावा करून उपाय निघतो आणि त्यातूनच एक नवनिर्मिती होऊन ती स्वतःच्या व इतरांच्या कशी उपयोगी पडते याचे अनेक उदाहरणं देखील त्यांनी दिले. तसेच नैसर्गिक गोष्टींचा वापर करून उच्च दर्जाचे उत्पादन कसे करता येतील, बाजारात कशाची जास्त मागणी आहे , त्यासाठी काय करावे व कशी सुरुवात करावी, कमी भांडवलात काय करता येईल.या व अशा अनेक गोष्टींचा त्यांनी उहापोह केला. यानंतर शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या व महिलांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला.
याप्रसंगी विकास कोटेचा यांनी शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणून संबोधत स्वतःचा माल स्वतः विकण्याचा सल्ला दिला. जिद्द व मेहनतीच्या जोरावर कोणतेही यश संपादन करता येते. प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी विदयार्थ्यांना तसेच शेतकर्यांना स्टार्ट अप इंडिया या उपक्रमाचे फायदे समजाऊन संगतांना अधिकाधिक नावीन्यपूर्ण उद्योगांचे महत्त्व सांगीतले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. गीता पाटील यांनी केले व आभार डॉ. चेतनकुमार शर्मा यांनी मानले. सूत्रसंचालन नरेंद्र जोशी यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक प्रभाकर महाले, उप प्राचार्य डॉ. विनोद चौधरी, डॉ. रत्ना जवरास, डॉ. अमर वाघमोडे, सौ. वैशाली संसारे, श्री. अनिल धनगर, श्री. शरद पाटील, राजू मोपारी, नामदेव बडगुजर, समीर पाटील, विजू धोबी यांनी सहकार्य केले.