भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील रेल्वे उत्तर वार्डातील झोपडपट्टी धारकांचे रेल्वे प्रशासन व भाजपा नेत्यांनी मिळून कटकारस्थान रचून कित्येक परिवारांना बेघर केल्याच्या आठवणी आजही न विसरणाऱ्या आहेत. असे झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसनांसाठी प्रयत्न करणार असल्याचे चंद्रकांत हंडोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अधिक माहिती अशी की, रेल्वे प्रशासन व भाजपा नेत्यांनी झोपडपट्टी रहिवाशांना आमिष दाखवून तुम्हाला पर्यायी घरे देण्यात येणार असल्याचे प्रलोभन देऊन रेल्वे प्रशासन व भाजपा नेत्यांनी कटकारस्थानाने ३५०० झोपड्या उध्वस्त करून उत्तर वार्डातील झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्यात आले होते. झोपडपट्टी धारकांना सरकारने वाऱ्यावर सोडले असून कित्येक परिवार उघड्यावर आपले संसार करीत आहेत. या झोपडपट्टी धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी भुसावळ शहर कॉग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत हंडोरे यांच्या सोबत चर्चा करुन झोपडपट्टी धारकांना न्याय मिळवुन देण्यासाठी पुढील आठवड्या मध्ये मुंबई येथे बोलवण्यात आले आहे. तसेच बाळासाहेब थोरात महसुल मंत्री व समाज कल्याण मंत्री यांची भेट घेऊन यांच्या मार्फत भुसावळातील झोपडपट्टी धारकांना पर्यायी जागा व सामाजिक न्याय विभागा मार्फत अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न चंद्रकांत हंडोरे करणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.