जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती उत्तर महाराष्ट्र व औरंगाबाद जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने समितीतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी करण्यात आली. जयंती दिनानिमित्ताने रामेश्वर भदाणे शिवव्याख्याते (अमळनेर) यांचे राष्ट्रमाता जिजाऊ समजून घेऊया! या विषयावर यूट्यूब च्या माध्यमातून ऑनलाइन व्याख्यान संपन्न झाले.
सदर व्याख्यानात रामेश्वर भदाणे यांनी आपल्या ओघवती शैली मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जीवन कार्य, राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जीवन परिचय व इतिहास राष्ट्रमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार तसेच हिंदीवी स्वराज्य मध्ये असलेले योगदान या विषयावर अनेक उदाहरणे व दाखले देऊन भदाणे सरांनी व्याख्यान दिले. तसेच कार्यक्रमात जळगाव समितीच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाइन वकृत्व स्पर्धेचा निकाल राज्य संघटक प्राचार्य हरिभाऊ पाथोडे यांच्या माध्यमातून घोषित करण्यात आला . आपल्या अध्यक्षीय भाषणात हरिभाऊ पाथोडे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केले तसेच त्यांच्या कार्याचा उजाळा आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिला. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून उगलाल शिंदे, मनीषा सूर्यवंशी, के. आर. केदार, यांनी परीक्षक म्हणून आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पडली तसेच स्पर्धेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सपकाळे तर प्रास्ताविक पंकज देशमुख (औरंगाबाद) व आभार प्रदर्शन महेश शिंपी (जळगाव) यांनी केले. कार्यक्रमाचे प्रसारण तथा टेक्निकल सहाय्य विभागीय संपर्कप्रमुख नरेंद्र पाटील (नंदुरबार) यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जे. डि. ठाकरे, सागर पाटील, सुधीर काळवाघे, योगेश करंदीकर, भगवान रोकडे, दत्ता सोनवणे, अनिल पाटील, छाया इसे, अर्चना सपकाळे, प्रियंका साळवे, निशा पाटील यांनी परिश्रम घेतले.