अमळनेर(प्रतिनिधी) बोरी मध्यम प्रकल्प अंतर्गत तामसवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने त्याचे योग्य नियोजन करून भविष्यात त्यातील पाण्याचे योग्य पद्धतीने वाटप होऊन अमळनेर शहराला पाण्याचे वाटप होण्याबाबत अमळनेर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी पाणीपुरवठा मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्र पाठवले आहे.
सदर पत्रात नमूद केले आहे की, बोरी मध्यम प्रकल्प ( तामसवाडी ) ता.पारोळा या प्रकल्पाचा एकूण जलसाठा 40.31 दलघमी असून प्रकल्पाच्या साचलेल्या गाळाच्या सर्व्हेक्षणानुसार 5.22 दलघमी एवढी बोरी प्रकल्पाची जल क्षमता गाळ साचल्यामुळे कमी झालेला आहे. अमळनेर शहरासह, पारोळा, बहादरपूर, महाळपूर शिरसोदेसह बोरी नदीकाठावरील गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी प्रकल्पातून 136 दलघफु पाणी उचल करण्यासाठी जलनियोजनात तरतूद आहे. सुदैवाने यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे बोरी प्रकल्पाचा जलसाठा पुर्ण क्षमतेने भरलेला आहे. सद्दस्थितीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सटलेला आहे. तथापि भविष्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यास आवश्यक उपाययोजनेसाठी बोरी प्रकल्प अहवालाच्या तरतूदीनुसार संदर्भाधीन क्र. 1 ते 3 अन्वये अमळनेर नगरपरिषद, अमळनेरसाठी 18.80 दलघफु पाणी प्रकल्पातून उचलण्यासाठी बोरी प्रकल्पाच्या जलनियोजनातील तरतूदीनुसार पाणी आरक्षणासाठी जिल्हास्तरीय आकस्मित पाणी निश्चिती समितीने करावयाचे बिंगर सिंचन आरक्षण बैठकीत अमळनेर नगरपरिषद,अमळनेर आणि पारोळा शहरासह नदीकाठावरील गावांसाठी पाणी आरक्षित करण्यात यावे हि विनंती पत्रात केली आहे.