अमळनेर (प्रतिनिधी) आधार कार्ड लिंक करायला आलेल्या वृद्ध महिलेला बोलण्यात फसवून, दोघांनी महिलेच्या गळ्यातील १५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लंपास केली. ही घटना १० रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास राणे झेरॉक्स जवळ घडली.
अंजनाबाई साहेबराव पाटील (वय ७०, रा. पिंपळे खुर्द) ही महिला १० रोजी दुपारी आधार कार्ड व मोबाईल लिंक करण्यासाठी अमळनेर बसस्थानकावर आल्या होत्या. त्याचवेळी ३० आणि ५० वर्षीय दोन संशयित भामट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवले, तसेच पाणी आणून देतो, असे सांगून ते दोघे निघून गेले. काही वेळाने महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी अमळनेर पोलिसात दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ सुनील हाटकर हे करीत आहेत.