जळगाव (प्रतिनिधी) राज्य निवडणूक आयोगाने बोदवड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार बोदवड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार बोदवड नगरपंचायतीच्या क्षेत्रात २१ डिसेंबर रोजी (मंगळवार) मतदान होणार असल्याने जिल्हाधिकारी यांनी स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे.
सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात येणाऱ्या आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागु राहील (उदा: राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगीक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासावी सवलत देण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.