अमळनेर (प्रतिनिधी) येथील खा. शि. मंडळाच्या जी एस हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक डी.एच. ठाकूर,के.एस.गायकवाड, के.पी.पाटील, के.आर. बाविस्कर, उमाकांत हिरे, एस.आर. चव्हाण तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.