चाळीसगाव (प्रतिनिधी) डिजिटल करन्सीत गुंतवणूक केल्यावर जादा नफा देण्याचे आमिश दाखवत शहरातील 25 वर्षीय तरुणाची तब्बल दोन लाख 96 हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात ठाण्यात शनिवारी रात्री अज्ञात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चाळीसगावात खाजगी नोकरी करणारे संकेत जयराज बडगे (25, मूळ रा. तिरोडा, जि. गोंदिया, ह.मु. चाळीसगाव) यांच्या व्हॉटस्अॅप ्रमांकावर तीन जणांनी संपर्क साधून डिजिटल करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास उत्तम परताव मिळेल, असे आमिष दाखवले. संशयितांनी 3 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या दरम्यान वारंवार संपर्क साधून विश्वास संपादन केला व वेळोवेळी ऑनलाईन रक्कम स्वीकारली. दीड महिना होऊनही नफा मिळाला नसल्याने तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संपर्क साधणार्या तीन जणांविरुद्ध जळगाव सायबर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील करीत आहेत.