TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

The Clear News Desk by The Clear News Desk
February 13, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी येथे एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी एक पत्र मिळाले. त्यात नक्षलवाद्यांनी बदला घेण्यात येईल, असा उल्लेख केला आहे. त्यानंतर त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. शिंदे ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत २५ नक्षलवादी मारले गेले होते. त्यात एका कमांडरचाही समावेश होता. अधिकाऱ्याने सांगितले की, धमकीचे पत्र मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांना मिळालेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला आहे. तत्पूर्वी शनिवारी माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी सांगितले होते की, यापूर्वीही अशा प्रकारच्या धमक्या मिळालेल्या आहेत. गडचिरोलीचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे आणि मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा उद्देश आहे. गडचिरोलीत नक्षलवादाच्या समस्येचा निपटारा करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विकास करणे हाच आहे, असेही शिंदे म्हणाले होते.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

यापूर्वीही शिंदे यांना धमक्या

ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना यापूर्वीही अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत. मागील वर्षी ऑक्टोबरमध्येही शिंदे यांना धमकीचे पत्र मिळाले होते. त्यावेळी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास ठाणे खंडणीविरोधी पथक करत होते. मुंबईतील मलबार हिल येथील शिंदे यांच्या सरकारी निवासस्थानी ४ ऑक्टोबरला धमकीचे पत्र आले होते. शिंदे यांच्या जिवाला धोका असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले होते, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते. शिवाय एका कमिटीच्या नावाने हे पत्र आले होते. ‘गडचिरोलीमध्ये तुम्ही भरपूर विकासकामे करीत आहेत,’ असेही या पत्रात लिहिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले होते. ‘बदला’ घेण्याची भाषा या पत्राद्वारे केली होती. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या धमकीनंतर शिंदे यांच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #EknathShinde

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

दीर-भावजयची एकमेकांना मिठी मारत विष प्राशन करून आत्महत्या ; ८ दिवसांपासून होते बेपत्ता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीटभट्टी मालकाकडून झालेल्या मारहाणीत मजुराचा मृत्यू ; पहूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

December 17, 2022

भुसावळातील एकाला मनी लाँड्रींगच्या गुन्ह्याचा धाक दाखवून २२ लाखांत गंडवले !

July 31, 2024

जळगावात ईलेक्ट्रॉनिक दुकानदाराची ऑनलाईन फसवणूक !

December 16, 2020

वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा

September 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group