चाळीसगाव (प्रतिनिधी) बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ अल्टो कार व लक्झरी यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भिषण अपघातात कारमध्ये बसलेल्या चाळीसगाव तालुक्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली.
या घटनेने चाळीसगाव तालुका सुन्न झाला असून चाळीसगावकडे येत असताना हा विचित्र अपघात घडला आहे. या अपघातात इंदल चव्हाण (वय 38 रा. सांगवी ता. चाळीसगाव), योगेश विसपुते (वय-३२ रा. चाळीसगाव), विशाल विसपुते (वय-३८ रा. चाळीसगाव) यांचा बळी गेला आहे. तर ज्ञानेश्वर रघुनाथ चव्हाण, मिथुन रमेश चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच मृतांमध्ये योगेश विसपुते व विशाल विसपुते हे सख्खे भाऊ होते.