भुसावळ (प्रतिनिधी) येथे शुक्रवार रोजी कतिया समाज समिती भुसावळतर्फे माँ नर्मदा जयंती व दिप दान माॅ नर्मदा मंदिर, रेल्वे फिलटर हाऊस भुसावळ येथे आयोजन करण्यात आले. यावेळी मध्य प्रदेश कतिया समाजचे प्रांत अध्यक्ष महेश कुलहारे, राहुल सेजकर उपस्थित होते. तसेच कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
समाजातील महिला व पुरुषांनी तापी नदीच्या काठी असलेले माँ नर्मदा मंदिरात सकाळी १० वाजेला महापूजा करण्यात आली. आणि प्रसादचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संध्याकाळी तापीनदीत दीपदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नर्मदा प्रसाद मडलेकर, सचिव सुनिल नागराज, कोषाध्यक्ष सुरेश लखोरे, प्रकाश झोरे, शंकरलाल उमरीया, जैनारायण उमरीया, पुरुषोत्तम नागराज, हिरालाल पाटणकर तसेच भुसावळ युवा कतिया समिती योगेंद्र हरणे, विजय दमाडे, विनोद सेजकर, धनंजय मडलेकर, गोविंद सेजकर, राजेंद्र दमाडे, मुकेश पाटणकर, जितेंद्र पाटणकर, मनोज दमाडे, विवेक कुलहारे, अमित सागुले, नर्मदा प्रसाद दूनगे आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
















