TheClearNews.Com
Sunday, August 31, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Maharashtra Budget 2022 : अजित पवारांनी अर्थसंकल्पात केल्या महत्त्वाच्या घोषणा ; वाचा तुम्हाला काय मिळाले?

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर केला. त्यांनी विकासाची पंचसूत्री सादर केली. याअंतर्गत कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रासाठी तरतूदी करण्यात आल्या आहेत.

राज्यात सीएनजी स्वस्त होणार. कर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर
मुद्रांक शुल्काच्या दंडाच्या रकमेत सवलत देणार
सोने, चांदी उद्योग निर्यात आयात डिलिव्हरी कागदपत्रावरील कर माफ करणार
जलमार्गावरील बोटींवर प्रवास करणारे प्रवासी, सामानावर करामध्ये सूट
चंद्रपूर-गडचिरोली वन्यजीवांना उपचारासाठी वन्यजीव बचाव केंद्र
पहिली ते आठवी पर्यावरण विषयाचा शालेय अभ्यासक्रम
पर्यावरण विभाग – २५३ कोटी रुपये
सार्वजनिक बांधकाम विभाग – रस्ते बांधकाम १५ हजार ७०० कोटी रुपये, इमारती बांधकाम १ हजार ८८ कोटी रुपये
नगरविकास विभाग ८ हजार ८०० कोटी रुपये
विधवा झालेल्या महिलांना भांडवलाच्या कर्जाची १०० टक्के परतफेड
२४ हजार ३५३ कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प
मराठी अभिजात भाषेचा दर्जा – विकास व संवर्धनासाठी १०० कोटी रुपये खर्चाचे मराठी भाषा भवन

READ ALSO

आमदार मंगेशचव्हाण यांच्या आव्हानामुळे खडसेंची सीडी एका दिवसात करप्ट

5 वर्ष, 57 महिने, 248 आठवडे, 1736 दिवस झालेत, कुठे आहे ती सीडी?” ; मंगेश चव्हाणांचा खडसेंना थेट सवाल !

महामंडळे –

बार्टी , सारथी , महाज्योती या संस्थाना विविध विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकी 250 कोटी रूपये
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधीत्व निश्चित करण्यासाठी नवीन समर्पित मागासवर्गीय आयोगाची स्थापना
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा 500 कोटी रुपयांवरुन वाढवून 700 कोटी रुपये

उद्योग –

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत 98 गुंतवणूक करारातून 189000 हजार कोटी रूपये गुंतवणूक, रोजगाराच्या 3 लाख 30 हजार नवीन संधी
ई-वाहन धोरणांतर्गत सन २०२५ पर्यंत वाहन नोंदणीत इलेक्ट्रीक वाहनांचा हिस्सा १० टक्के व मोठ्या शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीतील हिस्सा 25 टक्के करण्याचे उद्द‍ीष्ट. 5000 चार्जिंग सुविधा उभारणार.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 30,000 अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे 1 लाख रोजगार संधी
कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 100 टक्के व्याज परताव्याची पंड‍िता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक ही नवीन योजना.
राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पार्क.
मुंबईत पारेषण प्रणालीच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी 11530 कोटी रुपयाचे 5 प्रकल्प.
भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालयासाठी स्थापित करण्यासाठी 100 कोटी रूपये
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी 250 कोटी रुपये निधी
छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना” सुरु करणार.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापुरूषांशी संबंधित गावांतील 10 शाळांसाठी 10 कोटी रुपये निधी
मुंबई, पुणे व नागपूर येथे स्वातंत्र्यलढ्याशी निगडीत स्थळांचा “हेरिटेज वॉक”
रायगड किल्ला व परिसर विकासाकरीता १०० कोटी, राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या सहा किल्ल्यांसाठी १४ कोटी, मुंबईतील शिवडी व सेंट जॉर्ज किल्ल्यांच्या जतन व संवर्धन आराखड्यांसाठी 7 कोटी प्रस्तावित.
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांच्या गनिमी कावा युद्ध पद्धतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी युनेस्कोकडे सविस्तर प्रस्ताव
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत 500 कोटीची तरतूद,
औरंगाबाद येथील अमृतमहोत्सवी वंदे मातरम् सभागृहांकरीता 43 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
अष्टविनायक विकास आराखड्याकरीता 50 कोटी रुपये
पंढरपूर देवस्थान मंदिर विकासासाठी ७३ कोटी ८० लाख रूपये रकमेचा आराखडा
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष कार्यक्रमासाठी 75 कोटी रुपये.
स्मारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक उभारणार, महाराणी सईबाई स्मृतीस्थान विकास आणि श्री संत जगनाडे महाराज स्मारकांसाठी निधी उपलब्ध करुन देणार.
पंतप्रधान आवास योजना ग्रामीण भागातील 5 लाख घरकुल बांधकामाकरीता 6000 कोटी रूपये
मुंबईबाहेरील झोपडपट्टयांमधील सुधारणा मुलभूत कामे करण्यासाठी १०० कोटी

दळणवळण

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-7500 कोटी रूपये तरतुद.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा नागपूर ते भंडारा-गोंदिया,नागपूर ते गडचिरोली असा विस्तार करणार.
16039 कोटी रुपयांच्या नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पाकरीता भूसंपादन मुंबईतील मेट्रो मार्गिका क्रमांक ३, कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्ग‍िकेचा विस्तार कफ परेडपासून नेव्हीनगरपर्यंत.
पुण्यातील स्वारगेट ते कात्रज व पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी, खडकवासला ते स्वारगेट मेट्रो प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 3000 नवीन बसगाड्या व 103 बसस्थानकांच्या आधुनिकीकरण यासाठी भांडवली अर्थसहाय्य.
शिर्डी ,रत्नागिरी , अमरावती व कोल्हापूर विमानतळाची कामे गडचिरोलीला नवीन विमानतळ

सार्वजनिक आरोग्य

होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी मिळाव्या यासाठी राज्यसरकारचा निर्णय
मुंबई सेंट जॉर्ज पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आंबेडकर वैदकीय शिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे.
अन्न सुरक्षा चाचणी बळकटीकरण, प्रयोगशाळा सुधारणा २ कोटी खर्च
पुण्यात वैद्यकीय वसाहत उभारणार.
आरोग्य सुविधांवर ११ हजार कोटी रुपयांचा खर्च करणार
नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर, सातारा प्रत्येकी ५० खाटांची ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्यासाठी भांडवली खर्चसाठी १०० कोटी रुपये, आवर्ती खर्चासाठी १८ कोटी रुपये
अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी नवजात शिशू आणि माता यांच्यासाठी स्त्री रुग्णालये स्थापन करण्यात येतील
राज्यातील ५० खाटांपेक्षा जास्त क्षमता असलेल्या रुग्णालयांना वॉशिंग मशिन
मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आधुनिक उपचार पद्धती ५९ रुग्णालयात सुरू करणार
८ मोबाईल कर्करोग मोबाईल व्हॅन – ८ कोटी रुपये खर्च
४९ रुग्णालयाची बांधकाम दुरुस्ती
जालन्यात नवीन मनोरुग्णालयासाठी ६० कोटी रुपये

मनुष्यबळ विकास

1 लाख 20 हजार अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना ई शक्ती योजनेतून मोबाईल सेवा बालसंगोपनाच्या निधीत 1125 रुपयांवरुन 2500 रूपयांपर्यंत अनुदानात वाढ
प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी अमृत महोत्सवी महिला व बाल भवन उभारणार.
नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्रे सुरु करणार.
शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिंनीसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन डिस्पेन्‍सींग मशिन

कृषी क्षेत्र –

नियमित कर्जफेड करणारे शेतकरी 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान -10 हजार कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे.
भूविकास बँकेच्या 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रूपयांची कर्जमाफी, बँकेच्या कर्मचाऱ्यांची 275 कोटी 40 लाख रूपये एवढी देणी अदा करणार.
सोयाबीन व कापूस पिकांसाठी विशेष कृती योजनेसाठी ३ वर्षात १ हजार कोटी रुपये निधी देण्यात येईल.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्याचा समावेश करून अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करुन ते 75 हजार रूपये वाढ .
बाजार समित्यांनी (३०६) पायाभूत सुविधांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची 100% परतफेड करण्यासाठी सहाय
किमान आधारभूत किंमतीनुसार शेतमाल खरेदी कर‍िता 6 हजार 952 कोटी रूपयांची तरतूद
कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य
२० हजार ७६१ प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्थांचे (PACS) संगणकीकरण करण्याकरीता ९५० कोटी रूपयांची गुंतवणूक
मागील दोन वर्षात 28 सिंचन प्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला असून येत्या दोन वर्षात 104 प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी सन 2022-23 मधे 853 कोटी 45 लाख रुपये निधी
मृद व जलसंधारणाची दोन वर्षात 4 हजार 885 कामे पूर्ण करण्याचे नियोजन, 4 हजार 774 कोटी रुपये खर्च प्रस्ताव‍ित
सन 2022-23 मधे 60 हजार कृषिपंपांना वीज जोडणीचे उद्दीष्ट.
रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेमधे केळी, ड्रॅगन फ्रुट, एव्हॅकॅडो, द्राक्षे आदी फळ पिके तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा नव्याने समावेश
देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक, अशा एकूण तीन मोबाईल प्रयोगशाळा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आमदार मंगेशचव्हाण यांच्या आव्हानामुळे खडसेंची सीडी एका दिवसात करप्ट

July 26, 2025
जळगाव

5 वर्ष, 57 महिने, 248 आठवडे, 1736 दिवस झालेत, कुठे आहे ती सीडी?” ; मंगेश चव्हाणांचा खडसेंना थेट सवाल !

July 25, 2025
जळगाव

राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावळ यांची रोहित निकम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

July 22, 2025
चाळीसगाव

चाळीसगावात भाजपचा शरद पवार गटाला मोठा धक्का ; माजी उपनगराध्यक्षांसह माजी जि.प. सदस्याचा भाजपत प्रवेश !

July 18, 2025
जळगाव

जिल्हा परिषदेच्या गट- गणांच्या गावांमध्ये उलटफेर ; 68 गट, 136 गणांची प्रारूप रचना जाहीर !

July 15, 2025
धरणगाव

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. नितीन पाटील यांचा भाजपात प्रवेश !

July 12, 2025
Next Post

बापानेच 7 दिवसांच्या मुलीची गोळ्या घालून केली हत्या ; कारण ऐकून होईल संताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स पहिल्यांदाच ५०००० पार

January 21, 2021

धरणगावातील पी.आर.हायस्कूलच्या १९९७ च्या बॅचने घेतले आजचे चंद्राचे वाहन !

October 7, 2022

महिलांच्या सुरक्षेसाठी कोविड सेंटरमध्ये ३१ मार्चपर्यंत ‘एसओपी’ लागू करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

March 4, 2021

कोरोनाची लस घेतल्यानंतर वॉर्ड बॉयचा मृत्यू?; कुटुंबियांनी केला गंभीर आरोप

January 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group