नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात महाराष्ट्र सर्वाधिक कर्जबाजारी आहे, असे याबाबतची आकडेवारी सांगते. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्राचे कर्ज घेण्याचे प्रमाण विक्रमी ४७० टक्क्यांनी वाढले आहे. बाजार, बँका, वित्तीय संस्था आणि केंद्राकडून घेतलेली उचल या सगळ्याच्या ताळेबंदातून ही माहिती समोर आली. राज्यावरील एकूण कर्ज १,२२,००० कोटी आहे.
उत्तर प्रदेश गुजरातला चांगले रेटिंग
- उत्तर प्रदेशसारख्या मागास राज्याचे कर्ज घेण्याचे प्रमाण अवघे 50 टक्के एवढेच आहे
- गुजरातने गेल्या चार वर्षात सर्वात कमी कर्ज घेतले आहे.
- कर्ज घेण्याच्या या प्रमाणामुळे दोन्ही राज्यांचे रेटिंग चांगले आहे.
- सर्व ३१ राज्यांनी २०१८-१९ मध्ये एकूण पाच लाख ६२ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. -हे प्रमाण चार वर्षात वाढून १० लाख ६० हजार कोटी रुपये झाले आहे.
अर्थ मंत्रालय म्हणते…
राज्यांनी मोठ्या प्रमाणात कर्जे घेतली असली तरी त्यांनी वित्तीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्याचे (एफआरबीएम) पालन केले असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने लोकसभेत स्पष्ट केले आहे.
राज्यांनी घेतलेले कर्ज (आकडेवारी कोटींमध्ये)
राज्य २०२१-२२ २०२० २१ २०१९-२० २०१८-१९
महाराष्ट्र १,२२,५१६ २,०९,५२९ ५७,२०६ २६,०२६
उत्तर प्रदेश ७५,५०९ ७९,८९८ ७३,७७९ ५१,५९५
गुजरात ५०,५०० ६०,७८७ ४३,४९२ ४३, १४७
मध्य प्रदेश ५७,३९९ ६४,४१२ ३४,३६४ २९,१२२
हरयाणा ६३, २५८ ४३,१६५४३,१७० ३३,७६०