TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा

परीक्षार्थीसाठी मार्गदर्शक सूचना

The Clear News Desk by The Clear News Desk
March 19, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेमार्फत राज्य सेवा पुर्व परिक्षा २०२० ही दि. २१ मार्च, २०२१ रोजी प्रथम सत्र सकाळ १० ते दुपार १२ व व्दितीय सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ५ या कालावधीत जळगाव शहरातील १६ उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेकरीता जिल्ह्यातून ६ हजार २६४ परीक्षार्थी परीक्षा देणार आहे. सदर परीक्षेकामी जिल्ह्यातील एकूण ४८९ इतका अधिकारी / कर्मचारी वर्ग यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

परीक्षार्थी यांना सकाळ सत्रासाठी सकाळी ८.३० पासून ते ९.३० पर्यंत व दुपार सत्रासाठी दुपारी १.३० ते २.३० वाजेपर्यंतच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाईल. उपस्थित सर्व उमेदवारांची तपासणी / झडती (Frisking) केली जाणार आहे.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

उमेदवारांना विशेष सुचना

प्रत्येक परीक्षेच्या उमेदवाराने सबंधित परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र ( डाऊनलोड करुन प्रिंट केलेले) आणने सक्तीचे आहे, उमेदवाराच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान एक मुळ ओळखपत्र तसेच त्याच्या दोन छायांकित प्रती सोबत आणणे अनिवार्य आाहे, स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्भुत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लटुथ, दुरसंचार साधने वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू तसेच पुस्तके, बॅग्स, पॅड, पाऊच, कॅल्क्युलेटर ई. साधने परीक्षा केंद्राच्या परीसरात वापरण्यास सक्त मनाई आहे, आयोगाने परवानगी नाकारलेली कोणत्याही प्रकारचे अनधिकृत साधन/ साहित्य परीक्षेच्या वेळी संबंधित उपकेंद्राच्य मुख्य प्रवेशव्दाराजवळ ठेवावे लागेल व त्या साधन / साहित्याची सुरक्षिततेची जबाबदारी संबंधिताची राहील, उमेदवाराला स्वत:चा जेवणाचा डबा / अल्पोपहार व पाण्याची बाटली आणण्याची परवानगी आहे. तसेच दोन पेपरच्या मधल्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे.

परीक्षा केंद्रात काळ्या शाईचे बॉल पॉईट पेन, पेन्सिल, प्रवेश प्रमाणपत्र, मुळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत तसेच ओळखीच्या पुराव्याचे मुळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत अथवा प्रवेश पत्रावरील सूचनेनुसार आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्यसह उमेदवाराला परीक्षा कक्षेत प्रवेश देण्यात येईल.

ताप, खोकला, थंडी इत्यादी प्रकारची लक्षणे असलेल्या अथवा ३८ डिग्री सेल्सिअस अथवा १००.४ डिग्री फॅरेनहाईट पेक्षा जास्त तापमान असलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था स्वतंत्र करण्यात येणार आहे, कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षेकरीता नियुक्त सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच परीक्षार्थी यांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. तसेच सदर परीक्षेकरीता नियुक्त सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच उमेदवार यांना खालीलप्रमाणे साहित्य पुरविण्यात येणार आहे.

A Besic Covid Kit (bck) – परीक्षेकरीता उपस्थित प्रत्येक उमेदवाराकरीता एक B. Extra Protective Kit (EPK) – परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता नियुक्त प्रत्येक अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी एक C. Personal Protective Equipment Kit (ppek) फक्त कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत असलेल्या उमेदवारांकरीता प्रत्येक ५० उमेदवारामागे १ या सख्येने तसेच लक्षणे दिसून येत असलेल्या प्रत्येक उमेदवारांच्या पर्यवेक्षणाकरीता नियुक्त समवेक्षकासाठी 1, परीक्षार्थी यांनी परीक्षेच्या दिवशी प्रवास करतांना परीक्षेचे हॉल टिकीट सोबत बाळगणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेकरीता नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांनी परीक्षेचे आदेश व शासकीय ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.

जळगाव शहरात परीक्षेच्या दिवशी परीक्षेकामीचे शाळा / महाविद्यालय सुरु राहतील, तसेच परीक्षार्थीसाठी जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक प्रवासासाठी सुरु राहतील, परीक्षार्थी यांना परीक्षेस सोडणेसाठी त्यांचेसोबत एक व्यक्तीस सुट राहील.

परीक्षा केंद्रावर प्रवेशाच्या आधी प्रत्येक उमेदवाराची थर्मल गनव्दारे तापमान तपासणी घेण्यात येणार आहे. त्याकरीता आयोगामार्फत पुरवठादार संस्था नेमण्यात आलेली आहे. सर्व उमेदवारांनी कोरोना विषाणूच्या संदर्भात परीक्षा केंद्रावर आवश्यक ती खबरदारी घेऊन त्यासंदर्भातील नियम पाळणे बंधनकारक आहे. सदर परीक्षेदरम्यान उमेदवाराने गैरप्रकार केल्याचे निदेर्शनास आल्यास त्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे केंद्रप्रमुख महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा २०२१ तथा निवासी उपजिल्हाधिकारी, राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
Next Post

मागासवर्गीय विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणी चौकातील गटारींना लोखंडी जाळी व पुलास कठडे बसवा ; अखिल भारतीय संत सावतामाळी संघटनेची मागणी !

July 23, 2022

धावत्या रेल्वेत पत्रकार महिलेचा विनयभंग ; भुसावळात गुन्हा दाखल

October 30, 2020

हातेड खुर्द येथील निवृत्त शिक्षकाचे घर फोडले ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास !

March 5, 2023

माजी नगरसेवक राजू फाफोरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

September 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group