मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. ३०) जाहीर करण्यात आला. यावर्षीच्या निकालात मुलींचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या चार स्थानांवर मुली आल्या आहेत. मुंबईच्या प्रियंवदा म्हाडदळकरने गुणवत्ता यादीत 13 वी रँक मिळवली आहे.
व्हीजेटीआय कॉलेजमधून प्रियंवदाने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आयआयएम बंगळुरु येथून व्यवस्थापन शाखेत एमबीएचा शिक्षण पूर्ण केला. खासगी क्षेत्रात नोकरी करत असताना चांगल्या संधी मिळत होत्या. मात्र असे असताना सुद्धा प्रियंवदाने प्रशासकीय सेवेत जाण्याचे ठरवले व त्यासाठी मागील दोन वर्षापासून परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली.
एमबीएची पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी आदान प्रदान योजनेमधून जर्मनीतील विद्यापीठातही काही महिने शिक्षण घेतले. इन्व्हेस्टमेंट बँकिंगसारखा खासगी क्षेत्रात मागणी असलेला विषय असूनही शासकीय सेवेत येण्याचे तिने ठरवले. प्रियवंदाने आपल्या शिक्षणासाठी घेतलेले शैक्षणिक कर्ज फेडण्यासाठी काही काळ खाजगी कंपनीमध्ये नोकरी केल्यानंतर तिने परीक्षेची तयारी सुरू केली. त्यासाठी जुलै 2020 मध्ये खाजगी कंपनीतील नोकरी सोडली आणि त्याचवर्षी परीक्षेचा अर्ज भरून जोमाने तयारी केली. मात्र पुरेशी तयारी झाल्याने तिने मागील वर्षी परीक्षा दिली नाही. गेल्यावर्षी 2021 साठी पुन्हा अर्ज भरला आणि देशातील अव्वल उमेदवारांमध्ये स्थान पटकावले.
प्रियवंदाने यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी वैकल्पिक विषयासाठी ऑनलाईन शिकवणीचा आधार घेतला. मात्र बाकी पूर्णपणे तिने सेल्फ स्टडीवर भर दिला आणि त्याचाच आधार घेत तिने आज हे यश मिळवले. प्रियवंदाचे वडील शासकीय सेवेत असल्याने प्रशासकीय सेवेबाबत उत्सुकता होती. फक्त नोकरीच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याची तिची इच्छा होती. त्यानुसार तिने नियोजन करत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून खाजगी नोकरी करून अखेर आपली स्वप्नपूर्ती उद्देशाने पाऊले उचलली आहेत.
महाराष्ट्रातील या उमेदवारांनी मारली बाजी
१) प्रियंवदा म्हाद्दळकर (१३)
२) ओंकार पवार (१९४)
३) शुभम भोसले (१४९)
४) अक्षय वाखारे (२०३)
५) अमित लक्ष्मण शिंदे (५७०)
६) पूजा खेडकर (६७९)
७) अमोल आवटे (६७८)
८) आदित्य काकडे (१२९)
९) विनय कुमार गाडगे (१५१)
१०) अर्जित महाजन (२०४)
११) तन्मय काळे (२३०)
१२) अभिजित पाटील (२२६)
१३) प्रतिक मंत्री (२५२)
१४) वैभव काजळे (३२५)
१५) अभिजित पठारे (३३३)
१६) ओमकार शिंदे (४३३)
१७) सागर काळे (२८०)
१८) देवराज पाटील (४६२)
१९) नीरज पाटील (५६०)
२०) आशिष पाटील (५६३)
२१) निखील पाटील (१३९)
२२) स्वप्नील पवार (४१८)
२३) अनिकेत कुलकर्णी (४९२)
२४) राहुल देशमुख (३४९)
२५) रोशन देशमुख (४५१)
२६) रोहन कदम (२९५)
२७) अक्षय महाडिक (२१२)
२८) शिल्पा खनीकर (५१२)
२९) रामेश्वर सब्बनवाड (२०२)
३०) शुभम नगराले (५६८)
३१) शुभम भैसारे (९७)
यावर्षीच्या परीक्षेत 685 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या नियुक्तीमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी देखील उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील 47 उमेदवारांनी यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळाले आहे. या निकालात राज्यातील पुण्याच्या शुभम भिसारेनं 97 वा क्रमांक पटकावला आहे. अक्षय वखारेनं 203 वा क्रमांक मिळवला आहे. तर ठाण्याच्या इशान टिपणीसने 248 वा क्रमांक पटकावला आहे. तर रोशन देशमुखने 451 वा आणि अश्विन गोळपकरने 626 वा क्रमांक पटकावला आहे.
















