मुंबई (वृत्तसंस्था) देशात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी आणि सी व्होटरचा एक सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला २६ ते २८ आणि महायुतीला १९ ते २१ जागा मिळवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एबीपी न्यूजसाठी सी व्होटरने 2024 चा पहिला ओपिनियन पोल घेतला. रविवारी (24 डिसेंबर) ओपिनियन पोल पार्ट 2 मध्ये देशातील 5 मोठ्या राज्यांचे सर्वेक्षण सादर करण्यात आले. वर्षभरापासून सुरू असलेल्या सी व्होटरच्या या ट्रॅकरमध्ये 2 लाखांहून अधिक लोकांच्या मतांचा समावेश आहे. यामध्ये त्रुटीचे मार्जिन अधिक उणे (मायनस) 3 ते अधिक उणे 5 टक्के आहे. यामुळे राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट मुकाबला असल्याचे स्पष्ट आहे. तर भाजपसह महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण करणारे आहे.
स्रोत- सी व्होटर
लोकसभेच्या जागाा- 48
भाजप+ 37%
काँग्रेस + 41%
इतर – 22%