बोदवड (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व असा दावा राष्ट्रवादी ,काँग्रेस, व ठाकरे गटाने केला होता. त्यात राष्ट्रवादीने चार लोकनियुक्त सरपंच आपले असल्याचे दावा केला होता. मात्र, निवडणुकीनंतरचे कवित्व आता रंगू लागले आहे.
धोंडखेडा ग्रामपंचायतच्या काही नवनिर्वाचित सदस्यांचा आज बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. त्या वेळी सदस्य योगेश पाटील यांनी सांगितले की धोंडखेडा ग्रामपंचायत मध्ये माझ्यासह निवडून आलेले ईश्वर सिंग पाटील, विजया दांडगे, रुपाली पाटील, संगीता माहुरे. हे आमदार चंद्रकांत पाटील यांचे समर्थक असून या निवडणुकीत भाजप तालुका उपाध्यक्ष विक्रमसिंग पाटील यांची स्वतःची उमेदवारी होती व त्यांनी लोकनियुक्त सरपंच पदासाठी वैशाली दांडगे, व सदस्यपदासाठी सागर दांडगे यांना निवडणुकीत विजय मिळण्यास सहकार्य केले आहे.
निवडणुकीत स्वतः विक्रमसिंग पाटील हे सुद्धा निवडून आलेले आहेत. तसेच विजया दांडगे यांचे विरुद्ध आम्ही कोणीही उमेदवार न दिल्याने त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत त्या सुद्धा आम्हांला सहकार्य करतील.गावाचे विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. धोंडखेडा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व अश्या चर्चा काल निवडणुकीनंतर सुरू झाल्या होत्या म्हणून आज आम्ही बोडवडचे नगराध्यक्ष आनंदा पाटील यांनी आमचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित केले होते तो सत्कार स्वीकारून आमची भूमिका स्पष्ट केली आहे, असे ‘क्लिअर न्यूज’शी बोलतांना योगेश पाटील यांनी सांगितले. या सत्कार प्रसंगी. हर्षल बडगुजर, गोलू बरडीया, माजी नगरसेवक देवेंद्र खेवलकर व धोंडखेडा आणि बोदवड येथील शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.