मुक्ताईनगर (प्रतिनिधी) आमदार मंगेशदादा चव्हाण आमच्या भाजपचा कोहिनूर असून त्याला जी जबाबदारी दिली ती तो फत्ते करतोच, असे गौरवोद्गार ना. गिरिषभाऊ महाजन यांनी आज काढले. ते नगराध्यक्षा नजमाताई तडवी यांच्या पदभार सभारंभ प्रसंगी बोलत होते.
मुक्ताईनगर येथील भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षा नजमाताई तडवी यांच्या अपात्रतेला स्थगिती मिळवून देण्यात आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ना. गिरिषभाऊ महाजन यांच्या माध्यमातून नुकतेच यश मिळविले आहे. यापूर्वी देखील ना.गिरिषभाऊ महाजन व भाजपा पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत एकनाथ खडसे व राष्ट्रवादी च्या ताब्यात असलेले जिल्हा दूध संघ व जिल्हा बँक भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आणायची कामगिरी आमदार मंगेशदादा यांनी केली होती.
आज ना.गिरिषभाऊ महाजन यांनी मुक्ताईनगर येथील जाहीर कार्यक्रमात आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे कौतुक केले व तो आमच्या भाजपचा कोहिनूर असून त्याला जी जबाबदारी दिली ती तो फत्ते करतो असल्याचे सांगितले. खरं म्हणजे हे फक्त आमदार मंगेशदादांचे कौतुक नसून भारतीय जनता पक्षासाठी काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी एक मूर्तिमंत उदाहरण आहे. एका अल्पसंख्याक आदिवासी समाजातील महिलेला केवळ राजकीय स्वार्थासाठी गेल्या १.५ वर्षांपासून त्रास दिला गेला व त्यांच्या लोकप्रतिनिधी पदापासून वंचित ठेवण्याचे पाप काही मंडळींनी केले मात्र शेवटी अनीतीवर नीतीचाच विजय होतो, ना.गिरिषभाऊ महाजन यांच्या माध्यमातून सौ.नजमाताई यांना न्याय मिळाला व त्या आज पुन्हा आपल्या नगराध्यक्षा या पदावर विराजमान झाल्या. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व कार्यकर्त्यांसाठी सर्व ताकद पणाला लावणारे ना.गिरिषभाऊ महाजन व भाजपा-महायुती सरकारचे आभार मानतो, अशी भावनिक प्रतिक्रीय आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.
गेल्या वर्ष दोन वर्षात ना.गिरिषभाऊ महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील जिल्हा दूध संघ, जिल्हा बँक यासारख्या संस्था ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे तसेच संघटनात्मक जबाबदारी देताना देखील जेष्ठ कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नव्या फळी ला संधी दिली आहे. यातूनच पुढे आलेले आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासारखे तरुण कार्यकर्ते आपल्या नेत्याचा, पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत आहेत. ही सर्व परिस्थिती व तयारी पाहता आगामी काळात लोकसभा, विधानसभा, मनपा-न.पा., जि प. व प.स. निवडणुकांमध्ये ना.गिरिषभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष मोठ्या ताकदीने काम करणार, असल्याची भावना कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
यावेळी आ.श्री. राजुमामा भोळे, श्रीमती स्मिताताई वाघ, डॉ.राजेंद्रजी फडके, भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर व अमोलभाऊ जावळे, अशोकभाऊ कांडेलकर, नंदुभाऊ महाजन, श्रीकांत महाजन, प्रफुलभाऊ जवरे, रोहितदादा निकम, नितीन चौधरी सर, उज्वलाताई बेंडाळे, जयपालदादा बोदडे, पद्माकरभाऊ महाजन, विजयनाना बडगुजर, हिरालाल भाऊ चौधरी, सचिनभाऊ पानपाटील, स्थानिक नगरसेवक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते !