जळगाव (प्रतिनिधी) छत्तीसगड येथील विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात रविवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे २२ जवान शहीद झाले. त्या हल्ल्याचा जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीने त्रिव निषेध केला असून हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पित केलेली आहे.
निषेध व श्रद्धांजली सभा
जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष सभा जळगाव शहरातील रथ चौक येथील कार्यालयात पार पडली. त्यात शेख यांनी पदाधिकारी व सभासदांना भ्याड हल्ल्याची माहिती विशद केली. वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद चाँद सय्यद अमीर यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेधाचा ठराव सादर केला. त्यास उपस्थितांनी अनुमोदन दिले व दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी सलीम मोहम्मद, हारुन शेख महेबुब, ताहेर शेख, अल्ताफ शेख, अब्दुल रउफ, सादिक मुसा, तय्यब शेख आदींची उपस्थिती होती.