TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाच्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करावी : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
April 5, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी राज्य शासनाने पारित केलेल्या नियमावलीची जळगाव जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिलेत.

जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार सर्वश्री. संजय सावकारे, शिरीष चौधरी, किशोर पाटील, सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील आदि उपस्थित होते.

READ ALSO

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील कोरानाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी बाधित व्यक्तीच्या संपर्कातील रुग्णांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करावी. त्याचबरोबर रुग्णांना आवश्यक ते उपचार तातडीने मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणेने रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध राहतील याची काळजी घ्यावी. रस्त्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी निर्बंध कालावधीत विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस विभागाने कठोर कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. रेमडेसिविरचा साठा पुरेसा ठेवावा. रुगणालयांमध्ये पुरेशे व्हेटिलेटर रहातील याचे नियोजन करावे. अत्यावश्यक सेवेतील नागरीकांना त्रास होणार नाही याची काळजी घेताना विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत.

यावेळी कोविडवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावणे बंधनकारक करण्याबरोबरच रुग्णांना रुग्णालयांची बील देणे आवश्यक असून चोपडा येथे तातडीने व्हेटीलेटर उपलब्ध करण्याची सूचना खासदार रक्षाताई खडसे यांनी केली. तर कंटेमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सुचना खासदार उन्मेष पाटील यांनी केली.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरीकांचे सहकार्य महत्वाचे आहे. याकरीता नागरीकांमध्ये शिस्त निर्माण करणे आवश्यक असल्याचे आमदार शिरीष चौधरी म्हणाले तर संजय सावकारे यांनी बाधित रुग्णांना वेळेवर उपचार होण्यासाठी भुसावळ येथील रेल्वेचे हॉस्पिटल ताब्यात घेण्याची सूचना केली. कोरोनामुळे मृत्यु पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी रात्रीच्यावेळी सुरु रहावी याकरीता महानगरपालिकेने आवश्यक ते नियेाजन करण्याची सूचना आमदार सुरेश भोळे यांनी केली तर जिल्ह्यात शासनाच्या नियमावलीची कठोर अंमलबजावणी न झाल्यास लॉकडाऊन करावा तसेच कोरोनामुळे ग्रामीण भागातील जनतेत भितीचे वातावरण आहे. ग्रामसेवक, तलाठी यांनी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात मागील दोन/ तीन दिवस रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा होता. आता मुलबक साठा असून अजून इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. प्रशासनाच्यावतीने कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींचे आवश्यक ते सहकार्य मिळत असून जिल्हावासियांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी केले. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना सर्व पोलीस प्रभारींना दिल्या असल्याचे पोलीस अधिक्षक डॉ मुंढे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
Next Post

आ. मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना जामीन मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलेच्या पर्समधून ५० हजारांची रोकड लंपास !

March 15, 2025

इंधन दरवाढीचा भडका कायम, पेट्रोलनंतर आता डिझेलही शंभरीपार

October 9, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ७ कोरोनाबाधित, ६ झाले बरे !

July 28, 2021

संसदेवरील हल्ल्याला 19 वर्षे पूर्ण; “या भ्याड हल्ल्याला कधीही विसरणार नाही, पंतप्रधान मोदींकडून शहीदांना श्रद्धांजली

December 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group