मुंबई (वृत्तसंस्था) सरस्वतीची हत्या करणारा तिचा लिव्ह इन पार्टनर मनोज याने सरस्वतीच्या हत्येच्या काही दिवसापूर्वीच इंटरनेटवर कोणते विष घातक आहे, याची माहिती शोधत असल्याचे त्याच्या मोबाईलमधून समोर आले आहे. एवढेच नव्हे तर, मृत सरस्वतीचा मोबाईल फोन तो स्वतः जवळच ठेवत असयाचा. याच काळात त्याने डेटींग ॲपद्वारे काही महिलांशी चॅट देखील करायला सुरुवात केली होती. तसेच तो मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ देखील बघत असल्याची माहिती समोर येत आहे.
मनोज साने हा पोलीस तपासात पोलिसांची दिशाभूल करत आहे. पोलीस जे पुरावे त्याच्यासमोर मांडत आहेत, केवळ त्याबद्दलच तो बोलत आहे. सुरुवातीला सरस्वतीने विष पिऊन आत्महत्या केली असल्याचा दावा मनोजने केला होता. परंतु हत्येच्या काही दिवसापूर्वीच मनोज इंटरनेटवर कोणते विष घातक आहे, याची माहिती शोधत असल्याचे त्याच्या मोबाईलमधून समोर आले आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी सानेचा मोबाईल स्कॅन केला असता त्यांना आढळले की, तो नियमितपणे पॉर्न पाहत असे. त्याने काही पॉर्न साइट्सची नावे एका कागदावर लिहून ठेवली होती, जी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, आरोपीची रोज अनेक तास चौकशी केली जात होती, मात्र तो आपले म्हणणे बदलत राहिला. आरोपी मनोज साने याने वसईतील तुंगारेश्वर मंदिरात मयत सरस्वती वैद्यशी विवाह केल्याची माहिती देखील आता समोर आली आहे.