बोदवड (प्रतिनिधी) मनूर बु. येथील जि. प. शाळेत कार्यरत उपशिक्षिका मनिषा नारायण कचोरे यांना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाचा जिल्हा परिषद जळगावतर्फे दिला जाणारा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
शिक्षक दिना निमित्ताने संपन्न झालेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कारप्राप्त उपशिक्षिका मनीषा कचोरे 2009 साली प्रथम शिक्षण सेवक म्हणून जि. प. म. शाळा येवती या शाळेत शिक्षणसेवक म्हणून रुजू झाल्या विशेष म्हणजे याच शाळेत १ ली ते ४ थी पर्यंत शिक्षण घेतले होते. त्याच शाळेत ११ वर्ष त्यांनी अध्यापनाचे काम केले त्यानंतर जि.प. म. कन्याशाळेत त्यांनी ७ वर्षे कार्य केले. या शाळेत अनुसुचित जमातीतील मुलांच्या समस्या / अडचणी लक्षात घेऊन ‘शाळा आपल्या दारी’ या उपक्रमाव्दारे भिल्ल वस्तीमध्ये जाऊन अध्यापनाचे कार्य केले. व विदयार्थ्या शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले. २०१९ पासून जि.प . मनुर बु॥” या शाळेत कार्यरत आहे. या ठिकाणी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे, अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करणे, आनंददायी अध्यापनासाठी कृतियुक्त गीते घेणे इ. चा वापर करत विद्यार्थ्यांना शिक्षण गोडी निर्माण करण्यात यश मिळवले.
एमटीएस परीक्षा, ज्ञानदिप, मंथन यासारख्या स्पर्धा परीक्षा तयारी व गुणवत्तापूर्ण अध्यापन करण्यामध्ये अग्रेसर .जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव-यांचा सफर पहिलीच्या वर्गाची (२०१९-२०) या पुस्तिकेमध्ये भाषा विषयाशी संबंधित शिक्षकांचे अध्ययन अनुभव लेख लेखन काळात विद्यार्थ्यांना गुगलमिट – झुम अँपद्वारे ऑनलाईन क्लास – अध्यापन , गावामध्ये कोरोना नियमाबाबत जनजागृती अभियान, सर्वेक्षण आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष मधील कामकाजात सक्रिय सहभाग,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव डॉ पंकज आशिया यांचा ड्रीम प्रोजेक्ट व्ही अँपचा वापराबाबत कचोरे यांच्या इ. ४ थी च्या विदयार्थिनी भुमी विरेंद्र पाटील व आराध्या विजय घडेकर तालुक्यातून द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला . तसेच तालुकास्तर केंद्रात उत्कृष्ट सूत्रसंचालनासाठी त्यांना गौरवण्यात येते.
सोबतच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वैयक्तिक खर्चाने उपक्रम राबवून स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात. या सारख्या कामांची दखल घेत या वर्षीच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. या आधी सुद्धा त्यांना पुढील पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. २००९/१० मध्ये महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघटनेतर्फे – खान्देश कन्या कवयीत्री वहिणाबाई चौधरी जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, श्री स्वामी समर्थ गृप जळगाव व मौलाना आझाद फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विदयमानाने आदर्श शिक्षक सन्मान सोहळा -2029, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड जळगाव आयोजित जिल्हास्तरीय ‘तानुबाई बिर्जे लेखन’ स्पर्धेत प्रथम क्रमांक, असे त्यांना सन्मान प्राप्त आहेत. हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे मनूर गावातील पालक व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
















