जामनेर(प्रतिनिधी) : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या राजकीय संषर्घावर आधारित मराठी चित्रपट करण्याची इच्छा प्रसिद्ध गायक आणि दिग्दर्शक अवधूत गुप्तेनं जामनेर येथील एका कार्यक्रमात व्यक्त केली. झेंडा-2 (Zenda-2) हा चित्रपट गिरीश महाजन यांच्या जीवनप्रवासावर असेल असेही यावेळी अवधूत गुप्तेनं जाहीर केले.
जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्यातर्फे अवधूत गुप्तेच्या गीतगायनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर मनोगत व्यक्त करताना अवधूत गुप्ते बोलत होता. कार्यकर्ते जेवढे हतबल असतात तितकाच नेता हतबल असतो हे दाखवणारा झेंडा-2 चित्रपट असू शकतो असं अवधूत गुप्ते म्हणाला.
जळगाव जिल्ह्याला गिरीश महाजन सारखं नेतृत्व लाभलं भाजपातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक नाव म्हणजे गिरीश महाजन असून त्यांना या प्रवासात घरापासून पक्षापासून अनेक आव्हानांना ,तसेच विरोधाला सामना करावा लागणार असणार, आणि गिरीश महाजन यांच्या याच राजकीय संघर्षावर भविष्यात झेंडा चित्रपट करण्याची माझी इच्छा असल्याचे यावेळी प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेनं जाहीर केले.
झेंडा चित्रपटाला मिळाली प्रेक्षकांची पसंती
झेंडा हा चित्रपट 2010 मध्ये रिलीज लालेल्या झेंडा या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.या चित्रपटाची निमिर्ती आणि दिग्दर्शन हे अवधूत गुप्तेनं केलं होतं.या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर,संतोष जुवेकर,पुष्कर श्रोत्री आणि चिन्मय मांडलेकर यांनी प्रमुख साकारली. आता झेंडा-2 ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
जामनेर येथे पार पडलेल्या गीतगायनाचा कार्यक्रमच्या कार्यक्रमात अवधूत गुप्तनं गिरीश महाजन यांची मुलाखती घेतली. या मुलाखतीत अवधूत गुप्ते यांच्या रोखठोक प्रश्नांना मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले. आपला आज पर्यंतचा राजकीय प्रवास मंत्री गिरीश महाजन यांनी उलगडला. यावेळी अवधूत गुप्तेनं ‘सलग सहा वेळा आमदार झालात, काय सांगाल?’ असा प्रश्न गिरीश महाजन यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत गिरीश महाजन म्हणाले, आमदारकीसाठी पहिलीच निवडणूक होती माझ्या खिशात पैसे सुद्धा नव्हते मात्र माझे प्रतिस्पर्धी उमेदवार ईश्वर बाबूजी जैन हे लोकांना साखर वाटत होते. मात्र याही परिस्थितीत माझा विजय झाला. यानंतर सलग सहा वेळा मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो आहे. आणि हे मला जनतेन भरभरभरून प्रेम दिलं. या प्रेमामुळेच हे शक्य झालं असल्याचं गिरीश महाजन म्हणाले.