नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लज्जास्पद सत्य म्हणजे अनेक भारतीय दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत, अशा आशयाचे ट्वीट करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उत्तर प्रदेश पोलिसांवर टीका केली आहे.
हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पीडितेवर बलात्कार झाला नसल्याचे पोलिसांनी म्हटले होते. त्यावरून राहुल गांधी यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटले आहे की, लज्जास्पद सत्य म्हणजे अनेक भारतीय दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत. मुख्यमंत्री व त्यांच्या पोलिसांचे म्हणणे आहे की, कुणीही बलात्कार केला नाही. कारण त्यांच्यासाठी आणि इतर अनेक भारतीयांसाठी ती कुणीही नव्हती, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी सुरु असलेल्या एसआयटीला आणखी दहा दिवसांचा अवधी मिळाला आहे.