चाळीसगाव (प्रतिनिधी) तब्बल १२ वर्षानंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि.१८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानात आमसभा आयोजित करण्यात आली आहे.
चाळीसगाव तालुक्यात तब्बल १२ वर्षानंतर आ. मंगेशदादा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चाळीसगाव तालुक्यातील सर्व शासकीय विभागांची आमसभा आयोजित करण्यात आली आहे. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर आ. मंगेशदादा चव्हाण अधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार असल्याचे कळते.