जळगाव (प्रतिनिधी) येथील पिंप्राळा वाणी गल्लीतील माहेर असलेल्या तरुणीला सासरच्या मंडळींकडून छळ करुन मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांत पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, पिंप्राळा वाणी गल्लीत माहेर असलेल्या रुपाली घनश्याम कोतवाल (वय-२३) यांचा विवाह इंद्रप्रस्थनगरातील घनश्याम प्रभाकर कोतवाल यांच्याशी वर्ष-२०१० मध्ये झाला आहे. लग्नानंतर काही दिवस गेल्यावर विवाहीतेचा छळ करुन तिला क्रुरपणे मारहाण केल्याप्रकरणी पिडीतेने रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्यावरुन पती-घनश्याम, सासु लताबाई, दिर-ललीत, दिराणी- मिनाक्षी बडगुजर, दिर योगराज यांच्यासह नंणद उज्वला (रा.कल्याण), भारती (रा.जळगाव) अशांच्या विरुद्ध कौटूंबीक हिंसाचार अधीनियमाअंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक राजेंद्र चव्हाण करत आहेत.