TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : पोलीस कारवाईच्या माहितीसाठी आ. मंगेश चव्हाण यांचा अनेक ठिकाणी पत्रव्यवहार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2021
in गुन्हे, चाळीसगाव, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या कारवाई आणि तपासाबाबतची माहितीसाठी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे मागील काही महिन्यांपासून विविध ठिकाणी पत्रव्यवहार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात पोलिसांचे वाहन क्रमांक, प्रवासासाठीचा भत्ता, सरकारी वकिलांची नियुक्ती अगदी फोरेन्सिक लॅबकडे देखील आ.चव्हाण यांनी माहितीसाठी पत्रव्यवहार केला आहे. एकीकडे ठेविदारांचे पैसे परत मिळायला सुरु झाली असतांना दुसरीकडे तपास यंत्रणेवर दबाव निर्माण होईल, अशी माहिती आ.चव्हाण यांनी मागितल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, सुनील झंवरच्या पोलीस कोठडीच्या आपल्या युक्तिवादात आज विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी देखील अशा अर्जांमुळे पोलीस तपासात अडथळे येत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले.

 

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

बीएचआर घोटाळ्यात न्यायालयाने ११ संशयितांना जामीन देतांना पावत्या मॅचिंग केल्याच्या एकूण रकमेच्या ४० टक्के रक्कम भरण्याचे आदेश दिले. यामुळे ठेवीदारांची १०० टक्के रक्कम परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, यामुळे ठेवीदारांकडून पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके आणि सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांचे विशेष आभार मानले जात आहेत. परंतू दुसरीकडे चाळीसगाव भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मागील काही महिन्यांपासून राज्य सरकारसह पोलीस डेप्युटी डायरेक्टर, आर्थिक गुन्हे शाखा पुणे,पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून माहिती मागितली आहे.

 

यात कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी कुणाला अटक केली?, कोणत्या वाहनातून प्रवास केला?, त्या वाहनांचा क्रमांक, पोलिसांनी तपास कामी केलेल्या खर्चाचे भत्ते, बिल आदी माहितीचा समावेश असल्याचे कळते. अगदी फॉरेंसिक लॅबकडून आर्थिक गुन्हे शाखेने नेमक्या कोणत्या वस्तू तपासणी दिल्या आहेत?, त्याचा काय  रिपोर्ट देण्यात आला? अशी माहिती देखील मागितल्याचे कळते. अगदी जळगाव पोलिसांकडून देखील सुनील झंवर आणि जितेंद्र कंडारे या दोघांच्या घराबाहेर ते दोघं बेपत्ता असतांना पोलीस गार्ड कुणाच्या आदेशाने लावण्यात आले होते?, तसेच या बंदोबस्ताचे पैसे कुणी भरले? यासह इतर माहिती आ.चव्हाण यांनी मागितली होती. जळगाव पोलिसांनी काही माहिती दिली तर काही गोपनीय माहिती दिली नव्हती, असे कळते.

 

दुसरीकडे विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्या नियुक्तीबाबत देखील आ.मंगेश चव्हाण यांनी माहिती मागवली आहे. तपास महत्वपूर्ण टप्प्यावर असतांना आ. चव्हाण यांच्याकडून महत्वपूर्ण तसेच गोपनीय माहिती मागितली गेलीय. कारवाई केलेल्या अधिकाऱ्यांची नावे देखील मागितली गेल्यामुळे तर अधिकचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या अशी माहिती मागितल्यामुळे तपास यंत्रावर विनाकारण दबाव तर टाकला जात नाहीय?, अशी चर्चा सुरु झालीय. एकीकडे ठेविदारांचे पैसे परत मिळायला सुरु झाली असतांना दुसरीकडे तपास यंत्रणेवर दबाव निर्माण होईल, अशी माहिती आ.चव्हाण यांनी मागितल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, आ. मंगेश चव्हाण यांच्याशी याबाबत संपर्क साधला  असता त्यांनी विविध ठिकाणी पत्रव्यवहार केल्याचे मान्य केले. परंतू प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दुसरीकडे विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी देखील आज आपल्या युक्तिवादात अशा अर्जांमुळे पोलीस तपासात अडथळे येत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : ई- टेंडरिंग प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी झंवरच पाठवायचा शालेय पोषण आहाराच्या ठेकेदारांना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जांभोरा येथील युवा सैनिकांची शिवराणा प्रतिमा स्थापन करण्याची मागणी !

August 27, 2024

तब्बल १० वर्षींनी खडसेंना दिले सरकारने उत्तर

September 26, 2020

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसंबंधी उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना आदेश

March 24, 2021

विद्याप्रबोधनीतर्फे आयोजित विदेशात एमबीबीएसबाबत मार्गदर्शनपर चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group