चाळीसगाव (प्रतिनिधी) मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्यासोबत विवाह करणे तरुणासह त्याच्या नातेवाईकांना चांगलेच महागात पडले आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिसात या प्रकरणी तब्बल ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीचा चाळीसगाव तालुक्यातील लोंजे येथील गोकुळ कैलास पवार या तरुणासोबत विवाह पार पडला. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात पती गोकुळ कैलास पवार, अरुण फुलसिंग पवार, चुलत दीर सज्जन रतन पवार, सासरे कैलास फुलसिंग पवार, चुलत दीर ज्ञानेश्वर बाबुलाल पवार, दीर धनराज कैलास पवार, चुलत दीर रवींद्र युवराज पवार (सर्व रा.लोंजे ता. चाळीसगाव) भाऊसाहेब रामलाल सोनवणे, आई विमलबाई भाऊसाहेब सोनवणे, अण्णा अभिमन मालिक आजी कलाबाई अण्णा मलिक (सर्व रा. झोडगे, ता.मालेगाव जि.नाशिक) यांच्याविरोधात बालविवाह कायद्याप्रमाणे चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.