चाळीसगाव (प्रतिनिधी) एका विवाहितेचा पती व सासरकडून पैशासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव येथील रहिवासी व पुण्यात आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या एका विवाहितेचा पती व सासरकडून पैशासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ ऑगस्टला पुण्यातील दिघी पोलिस ठाण्यात विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पती रोहित परदेशी, सासरे भूषण परदेशी, सासू दीपाली परदेशी, नणंद वंशिता परदेशी तसेच अहमदाबादचे नातेवाईक विजयश्री व गणेश देशावरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
	    	
 
















