TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अक्कलकोटहून देवदर्शन करून घरी परताना भीषण अपघात ; ६ भाविकांचा जागीच मृत्यू, अकरा जण जखमी !

रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा ; मृतांमध्ये पाच महिलांसह एका मुलाचा समावेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 1, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाचा दुपारी चारच्या दरम्यान भीषण अपघात झाला. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी येथील वळणावर क्रूझर आणि सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. गाणगापूर आणि अक्कलकोट येथे दर्शन करून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. या जीपमध्ये एकूण १६ प्रवासी प्रवास करत होते.

मृतांमध्ये पाच महिलांसह एका मुलाचा समावेश !
अपघातातील सर्व भाविक कर्नाटक राज्यातील कलबुर्गी (गुलबर्गा) जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील अणूर येथील आहेत. मृतांमध्ये पाच महिलांसह एका मुलाचा समावेश आहे. अपघातात संगीता मदन माने (वय ३५, रा. बेडगा, ता. उमरगा), ललिता महादेव बुग्गे (वय ५०, रा. अणूर, ता. आळंद), छाया हनुमान ननवरे ( वय ४६, रा. इंदापूर, जि. पुणे), रोहिणी गोपाळ पुजारी (वय ४०, रा. अणूर, ता. आळंद), साईनाथ गोविंद पुजारी (वय २०, रा. अणूर, ता. आळंद) व सुंदराबाई भारतसिंग रजपूत (वय ५६, रा. अणूर, ता. आळंद) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

जखमींवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार !
या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये कल्पना अशोक कुंदले ( वय ४०), भावेश आकाश कुंदले (वय १९), रेखा गोविंदा पुजारी (वय ३५), सुमित गोपाल पुजारी ( वय १०), अशोक सिद्राम कुंदले (वय ५५), कोमल माणिक शामदे (वय ४५), सुनील हनुमंत पांचाळ (वय ४५), विठ्ठल हनुमंत ननवरे (वय ४५), अजित अशोक कुंदले (वय २५), महानंदा लक्ष्मण कुंदले (वय ३२, रा. सर्व अणूर, ता आळंद, जि. गुलबर्गा) यांचा समावेश आहे. यातील सुमित गोपाल पुजारी या दहा वर्षीय मुलासह दोघांची प्रकृती गंभीर आहे.

रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा !
हे सर्व भाविक देवदर्शन करून क्रूझर (क्र केए ३५ ए ७४९५) जीपमधून गुलबर्गाकडे निघाले होते. त्यावेळी गुलबर्गा येथून निघालेला सिमेंटचा ट्रक (क्र. एम एच १२ यूएल ७१८६) आणि या जीपची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, यातील सहा जण जागीच ठार झाले. रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेत जखमी आणि मृतांना बाहेर काढण्यास मदत केली.

रस्ता अरुंद व वळणाचा असल्याने अनेकदा चालकांचा सुटतो ताबा !
आळंद- अक्कलकोट मार्गावर सिमेंट बल्करची भरधाव वेगात वाहतूक होते. काही रस्ता अरुंद व वळणाचा असल्याने अनेकदा चालकांचा ताबा सुटतो. शुक्रवारच्या अपघातातील जीपही मुख्य रस्त्यावरून शेतात जाऊन उलटली होती. अक्कलकोट शहरातील अनेक खासगी वाहनांतून जखमींना अक्कलकोट रुग्णालयातून सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. होते. अपघातस्थळी भयावह चित्र होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

ईदनिमित्त सुटी...घरच्यांना फिरायला जायचं सांगून भावंड पोहोचली तलावावर ; पुढे घडलं भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डोक्यात लोखंडी पहारीने वार करून वडिलांचा निर्घृण खून ; मुलगा अटकेत !

August 4, 2023

मला क्रूझ ड्रग्ज पार्टीचं निमंत्रण होतं, पण मी गेलो नाही ; अस्लम शेख यांचा खुलासा

November 8, 2021

युग संपलं ; भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

February 6, 2022

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच दलित नवरदेवाची घोड्यावरून निघाली वरात !

January 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group