पाचोरा (प्रतिनिधी) येथील ‘शिवतीर्थ’ या शिवसेना कार्यालयापासून ढोल ताशांच्या गजरात आमदार किशोर पाटील यांच्या समर्थनार्थ भव्य रॅली काढण्यात आली. .त्यानंतर शिवसेना कार्यालयाच्या प्रांगणात रॅलीचे सभेत रूपांतर झाले.
आमदार किशोर पाटील सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. भडगाव-पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या समर्थनार्थ पाचोरा व भडगाव तालुक्यातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकार्यांनी काढलेल्या अभूतपूर्व रॅली काढली. या रॅलीत सहभागी झालेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती
यावेळी समर्थकांनी दिलेल्या घोषणांनी सर्व शहर दुमदुमले होते. भव्य रॅलीचे आयोजन करण्यासाठी शिवालय या त्यांच्या संपर्क कार्यालयात पाचोरा व भडगाव तालुक्यातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली होती. त्यात पाचोरा मतदारसंघाच्या परिपूर्ण विकासासाठी आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला होता.