TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वधूच्या लग्नसोहळ्यात मौलाना स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही ; तंझीम उलमा व आयम्माचा निर्णय !

मानियार बिरादरीने केले स्वागत व अभिनंदन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुस्लिम समाजाच्या लग्न सोहळ्यात उलमा हे निकाहला उपस्थित राहतील निकाह लावून देतील. परंतु त्या लग्नातील जेवणाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असा एकमुखी निर्णय जळगाव शहरातील तंझीम उलमा व आयम्मा म्हणजेच मुल्ला-मौलाना यांनी निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणीला सुरुवात सुध्दा झाली आहे. दरम्यान, या निर्णयाचे मानियार बिरादरीने स्वागत केले आहे.

प्रत्येक समाजात लग्नात लाखो रुपये खर्च केले जातात व त्याचा संपूर्ण भुर्दंड हा वधूच्या पालकांना सहन करावा लागतो, वास्तविक पाहता इस्लाम धर्मात नीकाह अर्थातच लग्न हे अत्यंत साधे व सरळ आहे. परंतु काही लोकांनी यास मोठे स्वरूप देऊन धर्मांच्या नियमाची पायमल्ली केलेली आहे. परंतु कोरोनामुळे लोकांना सरळ मार्गावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. व त्याचा एक भाग म्हणून सध्या लग्न सराई मध्ये मर्यादित लोकांची उपस्थिती व मर्यादित लोकांची जेवणावळी होत आहे. परंतु आता मुस्लिम वधूच्या लग्नसोहळ्यात मौलाना जेवणार नाही, असा निर्णय तंझीम उलमा व आयम्मानी घेतला आहे.

READ ALSO

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

जळगाव मानियार बिरादरीने केले स्वागत व अभिनंदन

सोमवारी १४ मार्च रोजी मस्जिद ए उमरमध्ये ईकरा हायस्कूल बोरणार मध्ये कार्यरत हारून शेख यांच्या कन्याचे लग्न नंदुरबार येथील मनियार आसीम अकील यांच्यासोबत लागले. जळगाव शहराचे शहर काजी व उलमा कौन्सिलचे क्रियाशील सदस्य मुफ्ती अतिकउर रहेमान यांनी खुदब ए निकाह सादर केला व लग्न सोहळे हे मुस्लिम पर्सनललॉ नुसार घेण्यात येईल व त्यास तुमची संमती आवश्यक असल्याचे आव्हान केले असता लग्न सोहळ्यात उपस्थित महाराष्ट्र मानियार बिरदारीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, कार्याध्यक्ष अब्दुल समद बारी, (नंदुरबार) सचिव डॉक्टर अल्तमश शेख, शहर अध्यक्ष सैयद चाँद, खजिनदार ताहेर शेख, तय्यब शेख, साजिद रज्जाक, जाहिद हुसेनसह नंदुरबारचे लियाकत, जुबेर शेख, वहिद कादिर यांनी जळगाव शहरातील उलमा यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. प्रातिनिधिक स्वरूपात उलमा कौन्सिलचे प्रतिनिधी मुफ्ती अतिकउर रहमान यांचे फारूक शेख यांनी शब्द सुमनाने अभिनंदन सुद्धा केले.

मानियार बिरादरी संपूर्ण महाराष्ट्रात हा नियम लावणार

कोविड महामारी संपल्यावर जळगाव जिल्हा मानियार बिरादरी व महाराष्ट्र महा मन्यार बिरादरीमार्फत एक मेळावा घेण्यात येणार असून त्यात लग्नाची आचारसहिता ठरविण्यात येईल असे महाराष्ट्र मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी घोषित केले आहे.

लग्नाची आचार संहिता

१) साखर पुडा (मगनी) ही पद्धत बंद करण्यात येईल.
२) लग्न शक्यतो सामूहिक विवाह कार्यक्रम अंतर्गत पार पाडणार.
३) वैयक्तिक लग्नसमारंभात वधूकडे फक्त पन्नास लोकांची वरात वर घेऊन जाणार.
४) वधूकडे स्थानिक पातळीवरील वराकडील नातेवाईकांना सुद्धा जेवणावळीमध्ये सहभागी होता होणार नाही.
५) कोणत्याही पद्धतीने वधू कडून हुंडा (दहेज) घेण्यात येणार नाही
६) लग्न अर्थातच निकाह हा मशिदी मध्येच लावण्यात येईल
७) वधु घरी आल्यावर वरा कडून दुसऱ्या दिवशी वलिमा म्हणजेच जेवणाची पंगत देण्यात येईल तीही त्याच्या ऐपतीनुसार
८) वधूकडील मंडळीने सुद्धा स्थानिक पातळीवर आपल्या शहरातील व मोहल्ल्यातील मंडळींना फक्त निकाह साठी आमंत्रित करावे जेवणाचे आमंत्रण देता कामा नये
९) वधूपित्याने मुलीच्या लग्नवर खर्च न करता शरियतनुसार मुलीला आपल्या प्रॉपर्टी मधून तिचा हक्क देण्यात यावा.( विरासत हक्क)

उपस्थितांची इंशाल्लाह म्हणून दाद
लग्नाची आचार संहिता समाजात, बिरादरीमध्ये जाऊन सर्व संमतीने तो निर्णय घेऊ त्यावर उपस्थितांनी त्यास इंशाल्लाह म्हणून संमती दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
Next Post

जागरूक ग्राहक बना..., जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शतकोत्तरी पी.आर. हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा

April 7, 2021

माजी सैनिक, विधवांकरिता घरपट्टी मालमत्ता कर माफीसाठी बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना

October 29, 2020

चाळीसगावात ठाकरे गटाकडून ‘महानोकरी मेळावा २०२४’ चे आयोजन !

June 28, 2024

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

June 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group