अमळनेर (प्रतिनिधी) येथील मयुरी दिनेश माळी यांची स्टुडंट्स ऑलंपिक असोसिएशनच्या जिल्हा समन्वयकपदी निवड करण्यात आली. युवती तालुका अध्यक्षपदी जयश्री पाटील यांची निवड झाली आहे. नुकतेच दोघांना याबाबतचे निवडपत्र प्राप्त झाले आहे.
मयुरी माळी यांचे क्रिडा व सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेता ही नियुक्ती झाली आहे.तसेच अमळनेर तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यात युवती तालुका अध्यक्षपदी जयश्री पाटील (क्रीडा विभाग), प्रज्ञा शिरुडकर (शैक्षणिक विभाग), भाग्यश्री कासार (सांस्कृतिक विभाग) आणि युवक तालुका अध्यक्षपदी विनायक चौधरी (क्रीडा विभाग),भूपेश साळुंखे(शैक्षणिक विभाग),महावीर बाफना (सांस्कृतिक विभाग) यांची निवड करण्यात आली आहे. स्टुडंट्स ऑलंपिक असोसिएशन राष्ट्रीय पातळीवर कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक या क्षेत्रात कार्य करत आहे. स्टुडंट्स ऑलंपिक असोसिएशनचे जळगाव जिल्हा सचिव योगेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्षा दिव्या भोसले व अनिल बाविस्कर यांच्या शिफारशीनुसार जिल्हाध्यक्ष तेजस पाटील यांनी तालुका कार्यकारणी घोषित केली आहे.













