महाड (वृत्तसंस्था) आज रत्नागिरीमध्ये मिमिक्री आर्टिस्टची सभा आहे, असे म्हणत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे.
राज ठाकरेंबद्दल बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या की, आज रत्नागितीमध्ये मिमिक्री आर्टिस्टची सभा आहे, असं बोलून त्यांनी सभास्थळी हशा पिकवला. आमचं हिंदुत्व हे हिंदुंना रोजी-रोटी देणारं हिंदुत्व आहे. त्यामुळे कुणीही आम्हांला हिंदुत्व सांगू नये. यावेळी बोलताना सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, अदानीचे 20 हजार कोटी कुठून आले?” असा सवाल करत भाजपवर हल्लाबोल केला. तसेच जेव्हा कधी भाजप अपयशी ठरते तेव्हा ते कधी महापुरूषांच्या, कधी सावरकरांच्या तर कधी धर्माच्या मागे लागतात, कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखेच काही नसते, “असेही त्या यावेळी म्हणाल्या. एमआयडीसीमधील भंगार विकून खाणाऱ्यांना जागा दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी महाडवासियांना केले. राणे साहेबांच्या दोन्ही पोरांना सीरियस घ्यायची मला गरज वाटत नाही. मुळात राणे साहेबांनाच सीरियस घ्यायची गरज नाही, अशा शब्दात त्यांनी राणे पिता-पुत्रांवर टीका केली.