TheClearNews.Com
Saturday, January 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नववर्षात महाराष्ट्रात मेगाभरती : २५ विभागांमध्ये भरणार १५ हजार ५११ पदे

सामान्य प्रशासन विभागाकडून ७ हजार ४६० रिक्‍त पदांचे मागणीपत्र सादर

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारच्या (Maharashtra State Government) २५ विभागांतील १५ हजार ५११ रिक्‍त पदांची भरती (Recruitment) एप्रिलअखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून ७ हजार ४६० रिक्‍त पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर करण्यात आले आहे.

तसेच उर्वरित ८ हजार ६१ पदांचे मागणीपत्र काही दिवसांत आयोगाला सादर केले जाणार आहे. त्यानुसार गट अ, ब आणि क प्रवर्गातील रिक्‍तपदे भरली जाणार आहेत. राज्य सरकारच्या महत्त्वाच्या एकूण ३४ विभागांमध्ये तब्बल अडीच लाखांपर्यंत पदे रिक्‍त आहेत. काही पदांची भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून तर काही पदे थेट खासगी संस्थांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने यापूर्वीच पाच संस्थांची निवड केली आहे. वित्त विभागाने विविध विभागांमधील महत्त्वाची पदे भरायला मान्यता दिल्याने रिक्‍त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती विस्कटली आणि महसूल मोठ्या प्रमाणावर कमी झाला. त्यामुळे सर्व रिक्‍त पदांची भरती होऊ शकली नाही. तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात जवळपास ७० हजार पदांची मेगाभरती होईल, अशी घोषणा झाली, परंतु पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. महाविकास आघाडी सरकारनेही सुरवातीला घोषणा केली, परंतु कोरोनाच्या संकटामुळे अजूनपर्यंत तेवढ्या पदांची भरती झालेली नाही. आता टप्प्याटप्प्याने पदभरती केली जात आहे.

READ ALSO

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील अधिवेशनात एमपीएससीमार्फत काही दिवसांत रिक्‍तपदांची भरती होईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही जवळपास साडेपंधरा हजार पदांची भरती आयोगामार्फत होईल, असे स्पष्ट केले होते. त्याची कार्यवाही सुरू झाली, परंतु अजूनही आठ हजार पदांचे मागणीपत्र आयोगाकडे सादर करण्यात आलेले नाही. मात्र, काही दिवसांत संबंधित विभागातील रिक्‍त पदांचे मागणीपत्र आयोगाला पाठविले जाणार असून नववर्षात त्या पदांची भरती होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला आहे.

‘एमपीएससी’कडे प्राप्त मागणीपत्र

विभाग : भरती होणारी पदे
सार्वजनिक आरोग्य : ९३७
कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय : ९२४
उद्योग, ऊर्जा, कामगार : २७९
अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण : ६२
पाणी पुरवठा व स्वच्छता : १६
सामान्य प्रशासन : ९५७
मराठी भाषा : २१
आदिवासी विभाग : ७
बृन्हमुंबई महापालिका : २१
पर्यावरण : ३
गृह : ११५९
वित्त : ३५६
वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये : १५७२
उच्च व तंत्रशिक्षण : ३५
शालेय शिक्षण, क्रीडा : १०५
सहकार, पणन, वस्त्रोद्योग : ३२
कौशल्य विकास, उद्योजकता : १७१
महसूल व वन : १०४
ग्रामविकास व पंचायतराज : ३२
नगरविकास : ९०
मृदा व जलसंधारण : ११
जलसंपदा : ३२३
विधी व न्याय : २०५
नियोजन : ५५

नववर्षातील मेगाभरतीचे नियोजन

राज्य शासनाच्या २५ विभागातील १५ हजार ५११ रिक्‍त पदांची होणार भरती
सरळसेवा व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरली जातील रिक्‍त पदे
सामान्य प्रशासन विभागाकडून ‘एमपीएससी’कडे सात हजार ४६० पदांचे मागणीपत्र
गट अ, ब आणि क प्रवर्गातील पदांची होणार भरती; तीन महिन्यात पदभरती होईल पूर्ण
राज्य सरकारच्या घोषणेनुसार अजून ८ हजार ६१ पदांचे जाणार आयोगाला मागणीपत्र

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
जळगाव

जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय! ४६ पैकी ४६ जागांवर कमळ

January 16, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
जळगाव

भाजपाच्या २७ बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

January 9, 2026
Next Post

दारूच्या नशेत बडबडला अन् आठ वर्षांपूर्वीचा खुनाचा 'असा' झाला उलगडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Bewertungen Zu Ggbet Studieren Sie Kundenbewertungen über Gg Bet

November 19, 2022

वीजबिल भरा, नाहीतर अंधारात रहा! महावितरणचा थकबाकीदारांना इशारा

January 22, 2026

ऑलिम्पिक : मीराबाई चानूला रौप्यपदक

July 24, 2021

धक्कादायक : आरोग्य सेतू अ‍ॅप कुणी तयार केले माहिती नाही ; केंद्राचे आरटीआयच्या अर्जाला उत्तर !

October 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group