सिल्लोड : वृत्तसंस्था
मुस्लिम पटेल देशमुख देशपांडे समाजातील गुणवंत विद्यार्थी गौरव व शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर सिल्लोड जि. औरंगाबाद येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य कृषिमंत्री ना.अब्दुल सत्तार, राज्यसभा सदस्य डॉ फौजिया खान,माजी आमदार सिराज देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सिल्लोड येथी मुकीम देशमुख व सिल्लोड येथील समाज बांधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सकाळच्या सत्रात शैक्षणीक मार्गदर्शन व दुपारी समाजातील पन्नास गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. 5 विशेष विद्यार्थ्यांना प्रत्येकी स्वर्गीय ए जी देशमुख यांच्या स्मरणार्थ 10 हजार रुपयांची वी स्कॉलरशिप देण्यात आली. खान्देश-विदर्भ-मराठवाडा येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजन-नियोजन अतिशय उत्तम होते.