नाशिक (वृत्तसंस्था) ‘पवारांच्या आरोपांना काही अर्थ नाही. जी कामं पूर्ण झाली आहेत त्याचीच उद्घाटनं होतायत. पवार साहेबांचा मेट्रोशी काडीमात्र संबंध नसताना ते मेट्रोमध्ये फिरून का आले? मी किती चांगलं काम करतोय हे दाखवायचा प्रयत्न त्यांनी केला, अशा शब्दात भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी पुण्यात मेट्रोच्या उद्घाटनासाठी येत आहेत. पण ते अर्धवट कामाचे उद्घाटन करतील. अजूनही मेट्रोचे काम पूर्ण झालेले नाही. याचा विचार पंतप्रधानांनी केला असावा’, असा उपरोधिक टोला शरद पवार यांनी लगावला होता. त्यावर नाशिक येथे भाजप नेते आमदार गिरीश महाजन म्हणाले शरद पवार यांच्या वक्तव्याला कुठेही काही अर्थ नाही. शरद पवार हे गतवेळी त्यांचा काही संबंध नसताना, काही कारण नसताना मेट्रोतून फिरून आले होते. मी किती चांगलं काम करतो हा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्या मेट्रोचा आणि त्यांचा काडीचा संबंध नाही. पण ते मेट्रोमधून का फिरले. मला वाटतं हे सगळे राजकीय आरोप-प्रत्यारोप आहेत. त्यांचा प्रयत्न हाच आहे की, पंतप्रधान येत आहेत.
पुणे भाजपमय, मोदीमय झालं. त्यामुळे त्यांना साहाजिकच वाईट वाटतंय. म्हणून त्यांना असं विधान करावं लागतंय. शरद पवार हे गतवेळी त्यांचा काही संबंध कारण नसताना मेट्रोतून फिरून आले होते. मी किती चांगलं काम करतो हा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्या मेट्रोचा आणि त्यांचा काडीचा संबंध नाही. पण ते मेट्रोमधून का फिरले. मला वाटतं हे सगळे राजकीय आरोप-प्रत्यारोप आहेत.” असं म्हणत शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाजन नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली.