नंदुरबार (वृत्तसंस्था) शहरासह तालुक्यातील वडाळी, मंदाना, कहाटूळ आदि मंडळातील गावांसह अन्य काही गावात आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सावळदा (ता.शहादा) येथील भूकंपमापन केंद्रात ३.२ रिस्टर स्केलची नोंद करण्यात आली आहे.
तसेच शहादा तालुक्यातील सावळदा भूकंप मापन केंद्रावर या भूकंपाची नोंद झाली आहे. मध्यप्रदेश राज्यातील एका गावात हे भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती समोर आली आहे. प्रस्तुत भूकंपाचे केंद्र शहरापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर असल्याचे समजते. या धक्क्यामुळे तालुक्यात कुठेही जीवित व वित्तहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. तरी ग्रामीण भागात भूकंपाच्या चर्चेला उधाण आले आहे.