जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोली, वसंतवाडी, जळके, वराड, वडली येथील रस्त्याचे जलनित्सारणासह नूतनीकरण होणार आहे. तसेच उद्या या रस्त्याचे भूमिपूजन समारंभ स्वछता व पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
तालुक्यातील कामांची अंदाजित किंमत २ कोटी ३६ लक्ष आहे. तसेच जळगाव तालुक्यातील शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाअधिकारी लोकप्रतिनिधी व समस्थ शिवसैनिक, परिसरातील सर्व सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटी चेअरमन, संचालक यावेळी उपस्थित राहणार आहेत.