जळगाव (प्रतिनिधी) मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबध असुन दिवसभरातुन या महिलेशी १०० कॉल्स झालेले असल्याचा खळबळजनक आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी एका पत्रकाराच्या हवाल्याने केला असल्याने राज्याच्या राजकारणात एकच भुकंप झाला आहे.
गेल्या काही वर्षापासून मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यातील राजकीय वैर सर्वसुत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीकेची संधी सोडत नाही. असे असतांना आज एकनाथराव खडसे यांनी पत्रकाराचा हवाला देत महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबध असुन मला या आयएएस महिला अधिकाऱ्याचे नाव माहित आहे. त्यांचे नाव घेणे मला उचीत होणार नाही, असे ही या पत्रकाराने सांगितले असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. तसेच मंत्री मंडळाचा विस्ताराच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे बैठक झाली होती. याबैठकीत गिरीश महाजन यांना अमित शहांनी बोलवून घेतल होत. त्यावेळी तुमचे महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबध आहे. दिवसभरातुन १०० वेळी तुमचे कॉल्स झालेले आहे हे कॉल्स डिटेल्स माझ्याकडे आहेत, असे अमित शहा यांनी महाजनांना सांगितले होते, असा दावा देखील खडसेंनी पत्रकाराचा हवाला देत केला आहे. दरम्यान अमित शहा यांच्याशी भेट झाली त्यांना या विषयात काय तथ्य आहे हे नक्की विचारणार असुन तर गिरीश महाजन यांचे गेल्या १० वर्षाचे सीडीआर तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल असे देखील सांगणार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.