पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) दिव्यांग व्यक्तिंना आधार देण्याची आमची सकारात्मक भूमिका असून त्यादृष्टीने काम करण्याचा प्रयत्न आही. दिव्यांगांना सहायभूत साधने देवून प्रयत्न करीत असून यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. दिव्यांगानी राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेवून ई – बाईकचा वापर व्यवसायासाठी प्रामाणिकपणे करून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा. त्यांना आनंदमय जीवन जगता यावे यासाठी दिव्यांग बांधवांनी आपल्या दिव्यांगत्वावर मात करून जिद्दीने प्रगती करा. येत्या शैक्षणिक वर्षांपासून शाळेत पायी जाणाऱ्या विद्यार्थिनींना दर्जेदार पद्धतीच्या दिड हजार सायकलींचे वाटप करणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी येथिल सुगोकी लॉन येथे आयोजित करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक तीन चाकी सायकल वितरण प्रसंगी केले. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दर्जेदार प्रतीच्या इलेक्ट्रिक तीनचाकी सायकलींचे वाटप करण्यात आले.
गुलाबभाऊ आमच्यासाठी आधारवड !
“बोले तैसा चाले – त्याची वंदावी पाऊले “ या ऊक्तीप्रमाणे गुलाबभाऊंचे कार्य असून राजाकाराणापलीकडे आमच्याशी नाते जोडून आमच्या दिव्यांग बांधवांना नेहमीच मदतीचा हात दिला आहे. गुलाबभाऊ सर्वसामान्यांसाठी व दिव्यांगासाठी आधारवड आहे. असे भावनिक मत तालुक्यातील दिव्यांग लाभार्थी शेख मुक्कदर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, सचिन पवार, मुकुंदराव नन्नवरे, गोपाल चौधरी, डॉ. कमलाकर पाटील, रमेश आप्पा पाटील, व पी.एम. पाटील सर यांनीही मनोगत व्यक्त केली.
सुरुवातीला पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भव्य – दिव्य अश्या सोहळ्याचे आयोजन व नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशन व मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आले होते. एच.डी.एफ.सी. बँकेच्या सहकार्याने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून 500 इलेक्ट्रिक तीन चाकी सायकली देण्याचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत 350 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक तीन चाकी सायकलींचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे . पुढील टप्प्यात उर्वरित ई सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः दिव्यांग व्यक्तींकडून समस्याही जाणून घेतल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. त्यांनी दिव्यांग व्यक्तींना सायकल वाटपचे महत्व विशद केले. तर आभार माजी सरपंच सचिन पवार यांनी मानले.
यांची होती उपस्थिती !
कार्यक्रम प्रसंगी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मुंबई येथिल खाजगी सचिव अशोक पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख डी.ओ.पाटील, शिवराज पाटील, संजय पाटील सर, संगोयो चे अध्यक्ष गजानननाना पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे,गोपाल चौधरी, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, देविदास कोळी, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, पी.एम.पाटील सर, नाना सोनवणे, दूध संघाचे संचालक रमेशआप्पा पाटील, सरपंच संघटनेचे सचिन पवार, शहर प्रमुख विलास महाजन, धनराज कासट, धोंडू जगताप, संदीप सुरळकर, शेतकी संघाचे ब्रिजलाल पाटील, डॉ. कमलाकर पाटील, रवि कापडणे , मोतीआप्पा पाटील, यांच्यासह तालुक्यातील सरपंच , उपसरपंच व सदस्य , दिव्यांग बांधव, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.