जळगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे पुत्र विक्रम यांच्या हळद समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे हे मंत्री येणार असून ते उद्या दुपारी हजेरी लावणार आहेत.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम यांचा विवाह २९ नोव्हेंबर रोजी पाळधी येथील श्री साईबाबा मंदिराच्या समोर आयोजीत करण्यात आलेला आहे. या समारंभाला राज्य मंत्रीमंडळातील बहुतांश मंत्री आणि बरेचसे आमदार आणि उच्चाधिकारी उपस्थिती लावणार आहेत. दरम्यान, याच समारंभाच्या आधी अर्थात हळदीच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उद्या रविवार दिनांक २८ रोजी दुपारी पाळधी येथे येत आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे हे देखील या समारंभाला उपस्थित राहणार असून यांचा दौरा जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केला आहे.
या दौऱ्याच्या वेळापत्रकानुसार दुपारी १ वाजुन ५५ मिनिटांनी जैन हिल्स येथील हेलीपॅडवर उपमुख्यमंत्र्यांचे आगमन होणार आहे. ते पाळधी येथील ना. पाटील यांच्या घरच्या हळदी कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. यानंतर ते ३ वाजता परत जाणार आहेत.