चाळीसगाव (प्रतिनिधी) दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून पाच महिन्यापुर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. दरम्यान, आता पीडिता गर्भवती राहिल्यामुळे हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पिडीत मुलीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पिडीता ही औरंगाबाद जिल्ह्यातून तिच्या आईसोबत पाच महिन्यापूर्वी चाळीसगाव येथे फुगे विकण्याच्या व्यवसायासाठी आले होते. पाच महिन्यापुर्वी एका दिवशी (तारिख आठवत नाही) दिवसभर काम करून शहरातील दर्गा परिसरात झोपले होते. त्याचवेळी दोन अनोळखी व्यक्तीं मुलीला चाकूचा धाक दाखवून थोड्या अंतरावर नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर याबाबत कुणालाही सांगितले तर तुझ्या आईला ठार मारू अशी धमकी दिली. परंतू आत पिडीता मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार खळबळजनक प्रक्रार समोर आला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निसाय सय्यद करीत आहे.