अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीला डान्स शिकवण्याच्या उद्देशाने तीचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलीसोबत जबरदस्ती विवाह केला. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन अमळनेर येथील जितेंद्र अनिल संदानशिव या तरुणाविरुद्ध पाच वर्षानंतर पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरत येथील तरुणी अमळनेर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. २०१९ मध्ये प्रताप महाविद्यालयात स्नेहसंमेलन असल्याने तिने जित स्टुडिओ आणि फिटनेस क्लासचे संचालक जितेंद्र अनिल संदानशिव (वय ३३, रा फरशी रोड अमळनेर) यांच्याकडे क्लास लावला होता. जितेंद्र याने पीडीतेला घरी नेऊन पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिचे व्हिडीओ व फोटो काढले. जर ही गोष्ट कुणाला सांगितली तर व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये जितेंद्रने पीडितेला महाविद्यालयाच्या हॉस्टेल मधून घेत धार येथे नेले. त्याठिकाणी शेतात तिच्यावर अत्याचार केला.
दुसऱ्या धर्माचा करायला लावला स्विकार
दि. २८ जून २०२२ मध्ये जितेंद्र ओळखीच्या लोकांना कार मध्ये बसवून ठाण्याला घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने पीडीतेशी विवाह केला होता. दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजी पीडीतेला दुसरा धर्म स्विकारायला लावला आणि त्या पद्धतीनुसार पुन्हा विवाह लावला.
पीडीतेने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल
लग्नानंतर संशयित जितेंद्रने पीडीतेला मानसिक व शारीरिक त्रास दिला. पीडितेने तिच्या भावाला दि. ९ ते दि. ११ फेब्रुवारी रोजी भावाला मॅसेज पाठवून मला वाचवा असे सांगितले. त्यानुसार दि. २५ फेब्रुवारी रोजी पीडिता तिच्या माहेरी सुरत येथे निघून गेली. त्यानंतर आता पीडितेने अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून पोलिस स्टेशनला संशयित जितेंद्र संदाणशीव याच्याविरुद्ध पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.