जळगाव (प्रतिनिधी) आज सायंकाळी हुडको येथील मस्जिद अली येथे जाकीर पठाण अल्पसंखांक महानगर प्रमुख, यांनी मुख्यमंत्रीचे आभार मानत आज पासून नमाज पठण सुरू केली व पेठे खाऊ घालून आनंद साजरा केला आहे.
सोबत अल्पसंखांक उपमहानगर प्रमुख वसीम खान, अल्पसंखांक विभाग प्रमुख जब्बार शेख, वाहतूक सेना उपाध्यक्ष अशपाक शाह, अल्पसंखांक महानगर प्रमुख इक्बाल शेख, सोबत जमील पलंबर, इक्बाल शेख, साजिद अली, पप्पू पठाण, आदिल शेख, अलीम तडवी, जविदभिस्ती, राजू बिस्ती, आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचा प्रसार रोखता यावा या साठी राज्यभरात मंदिर आणि मस्जिद बंद ठेवण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आला होता, मात्र गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्या नंतर अनेक ठिकाणी लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली होती. तसेच धार्मिक स्थळ बंदच ठेवण्यात आलेली असल्याने ती उघडण्यात यावी अशा प्रकारची मागणी वाढली होती या मागणी चा विचार करता राज्य सरकारने राज्यभरातील धार्मिक स्थळ उघडण्याचा निर्णय घेतला आहे. आज पासून सर्वच धार्मिक स्थळ उघडण्यात आल्याने सर्व धर्मियांच्या कडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे शिवसेना अल्पसंख्याक आघाडी तर्फे ही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. मशीद परिसरातील भाविकांनी पेढे वाटून या निर्णयाचा आनंद व्यक्त केला आहे.
या वेळी शिवसेना अल्पसंख्याक महानगर प्रमुख झाकीर पठाण, उप महानगरप्रमुख वसीम खान यांच्या सह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
















