भुसावळ (प्रतिनिधी) निवडणूक आयोगाने दिलेल्या जवाबदारीचे पालन न करता कामात कुचराई केल्याप्रकरणी भुसावळातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचे शिक्षक तथा यादी भाग क्रमांक 136 चे बीएलओ अजय चिंधू डोळे यांच्याविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुरुवारी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दिलेले काम जवाबदारीने न केल्याने गुन्हा !
सूत्रांच्या माहितीनुसार, अजय डोळे यांच्यावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यादी क्रमांक 136 म्हणून जवाबदारी सोपवण्यात आली होती मात्र डोळे यांनी दिलेल्या जवाबदारीकडे दुर्लक्ष केले तर यादी भागातील 185 मतदारांचे स्पष्ट फोटो गोळा करणे 80 पेक्षा जास्त वय असणार्या 44 मतदारांची पडताळणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या मात्र डोळे यांनी केवळ 31.58 टक्के काम पूर्ण केले.
जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये खळबळ !
निवडणूक आयोगाने सोपलेल्या कामांकडे डोळे यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना नोटीस बजावण्यात आली तसेच ते बैठकीसही अनुपस्थित राहत असल्याने गुरुवारी निवडणूक नायब तहसीलदार अंगद भागवत आसटकर यांनी प्रांताधिकार्यांच्या आदेशाने त्यांच्याविरोधात लोकप्रतिनिधीत्व 1950 चे कलम 32 व भारतीय दंडसंहिताचे कलम 188 अन्वये शहर पोलिसात गुन्हा दाखल केल्याने जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.