जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांपासून ते शेवटच्या अधिकाऱ्यांपर्यंत कशी लाचखोरी चालते, याची माहिती आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील, आमदार संजय सावकारे यांनी आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. आमदार मंगेश चव्हाणांनी तर थेट एका कंत्राटदाराला फोन लावून सव्वा कोटींच्या टेंडरमध्ये २० लाखांची लाच कशी द्यावी लागली, ते सभागृहात सादर केले. यामुळे एकच खळबळ उडाली.
…तर मी लागलीच आमदारकीचा राजीनामा देतो !
लाचेसाठी फायली कशा अडविल्या जातात, मला एकही शासकीय विभाग असा दाखवा, ज्यात एकही फाईल पेंडीग ‘नाही’ मी लागलीच आमदारकीचा राजीनामा देतो, असे आवाहनच आमदार चव्हाण यांनी सभागृहात दिले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही बैठक झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी आयष प्रसाद आदी उपस्थित होते.
टेबलाखालून दिल्याशिवाय काम मंजूरच होत नाही !
एमएसईबी, रस्त्यांच्या कामांचे टेंडर आरटीओ, कृषी, जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, महसूल, पोलिस, बांधकाम आदी विभागात कामांच्या फायली अडविल्या जातात, याची माहिती देत जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे सीईओ, पालकमंत्री, इतर मंत्रीही यामुळे आवाक झाले. जिल्हयात असे एक काम दाखवा जे इस्टीमेट प्रमाणे होते. वीज कंपनीत सव्वा लाखाचे कंत्राट घेणाऱ्याला जर वीस लाख संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांना द्यावे लागत असेल, आणि वरिष्ठ अधिकारी पाच लाख मागत असतील तर संबंधित कंत्राटदार आत्महत्या करेल नाहीतर काय करेल. कामे देताना टक्केवारीचे प्रमाण वाढले आहे. काम अडवून ठेवतात. आमदारांनी फोन केले तर काम करतो असे सांगतात. मात्र असा काही खोडा करून ठेवता ते काम टेबलाखालून दिल्याशिवाय मंजूरच होत नाही.
कामगांराकडून तीस तीस हजारांची मागणी एमएसईबीचे अधिकारी करतात : आ. किशोर पाटील !
आमदार किशोर पाटील म्हणाले माझ्या मतदार संघात सहा लाखात अतिशय चांगली अंगणवाडी तयार करण्यात येत आहे. निधी मंजूर आहे, मात्र जिल्हा परिषदेचे अधिकारी मंजूरी देत नाही. दुख कोणाला सांगावे ? आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. एमएसईबी’ ते कंत्राटी कामगांराकडून तीस तीस हजारांची मागणी एमएसईबीचे अधिकारी करतात. अन्यथा त्यांना कामावरून कमी करण्याची धमकी दिली जाते. एकीकडे बेरोजगारी आहे. दुसरीकडे कंत्राटी कामगारांकडून पेशांची मागणी होते. याप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले.
ओव्हर लोडेड वाहनांवर आरटीओ विभाग कारवाई करत नाही : आमदार संजय सावकारे !
आमदार संजय सावकारेंनी महामार्गावरून जाणाऱ्या ओव्हर लोडेड वाहनांवर आरटीओ विभाग कारवाई करीत नाही, यामुळे महामार्गा, राष्ट्रीय महामार्ग वारंवार खराब होतो. बांधकाम विभाग म्हणतो, वाहने ओव्हरलोड चालतात यामुळे रस्ते खराब होतात. आरटीओ विभागाचे श्याम लोही यांना जाब विचारला असता, आम्ही तपासणी केली. संबंधित वाहन ओव्हरलोड नसल्याचे उत्तर देतात. ओव्हरलोडवर आरटीओ कारवाई करीत नाही, अन रिक्षा चालकांना पंचवीस हजाराचा दंड करतात. आरटीओ अधिकाऱ्यांना आमदारांनी फोन केला तर नियम पुढे करतात. वाहन चालकांकडून रेट डबल करून घेतात. ही वस्तुस्तिथा आहे. यावर ग्रामविकास मंत्री महाजन यांनी आरटीओंना समज देतान कारभार सुधारण्याची सूचना केली.
विज वितरणच्या हलगर्जीपणामुळे भाजीविक्रेत्याचा मृत्यू : आ. चिमणराव पाटील !
आ. चिमणराव पाटील यांनी विज वितरणच्या हलगर्जीपणामुळे भाजीविक्रेत्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पारोळा येथे घडली वाला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला त्यानंतर प्रत्येक गावांमधील स्मशानभुमीचे प्रस्ताव सरसकट मंजूर करण्याची मागणी आ. चिमणराव पाटील यांनी केली पालकमंत्री ना. पाटील यांनी सर्व प्रस्ताव मंजूरीचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकणाऱ्या सरदार कंपनीवर कृषी विभागाने काय कारवाई केली याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी विचारणा केली असता, संबंधित बियाणे टेस्टींगसाठी नाशिक, हैदराबादला पाठविले होते. नाशिकचा अहवाल काही त्रुटी असल्याचे सांगीतले. मात्र हैद्राबादच्या लॅब चा अहवाल निल’ आल्याचे सांगताच, आमदार मंगेश चव्हाण म्हणाले. संबंधित बियाणे कंपनीवाल्याने लॅबला मॅनेज केले. गुणवत्ता नियंत्रकांनी आलेले बियाणे तपासले नव्हते. तपासले असते तर शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसते, कृषी विभाग आणी कंपन्याचे मोठी लिंक असते, यामुळेच कंपनीचा मालकाला जामीन मिळाला आहे. यावरून कृषी विभागात काम कसे चालते हे कळते.
खडसेंकडून ब्लॅकमेलिंग : गिरीश महाजन !
विकासाच्या कामात अडथळा आणण्याचे काम जुने असून, ते सत्तेत असतानाही ब्लॅकमेलिंग करायचे आता सत्तेत नसतानाही त्यांची ब्लॅकमेलिंग सुरु असल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर केला. यासह बोरसे नामक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्याला तब्बल २० वर्षे आपल्या घरी पोसला असल्याचाही आरोप गिरीश महाजन यांनी केला. दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना आपण स्वतः किती शुद्ध है त्यांनी सांगावे, असा टोलाही महाजन यांनी खडसेंना लगावला.