अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचा काळ चालू असला, तरी रोज सायंकाळी घरोघरी कानोसा घेतला असता टी.व्ही.वर सर्वत्र आयपीएलचे समालोचन ऐकु येत असते. आयपीएल मुळे थांबलेले क्रिकेट आता गल्लीबोळात सुरू झाला असून आज आमदारांना देखील क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आली नाही.
त्यातच सकाळी थंडीची चाहुल लागल्याने मॉर्निंग वॉक साठी रस्त्यावर लोक फिरू लागले आहेत, अमळनेर मतदार संघाचे आमदार अनिल भाईदास पाटील हे देखील घरी असल्यावर नियमितपणे सकाळी फिरायला जात असतात व आपल्या आरोग्याची काळजी घेत असतात. आज सकाळी फिरस्तीला जात असतांना दाट धुके मय वातावरण होते. मैदानावर काही तरुण क्रिकेट खेळत होते ते पाहुन आमदारांना देखील क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आली नाही. तरुणांसोबत जाऊन त्यांनी मनसोक्त क्रिकेट खेळण्याचा घेतला.