एरंडोल (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खासदार उन्मेश पाटील यांना एरंडोल तालुक्यातील विविध समस्या बाबत निवेदन देण्यात आले.
१) माहेजी ते हणमंतखेडे सिम गिरणा नदिवरील पुल बाधणेबाबत, २) हणमंतखेडे सिम – बाम्हणे – निपाणे रस्ता दुरुस्तीबाबत, ३) हणमंतखेडे सिम – ताडे – बाम्हणे हि गावे सिटी सर्वेला लावणेबाबत, ४) शेतकर्यांना वेळापत्रकाप्रमाणे नियमित विज मिळणेबाबत, ५) वसंत सहकारी कारखाना चालु करणेबाबत, या पाच विषयांवर निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल बागुल, मनसे ता. उपाध्यक्ष योगेश सपकाळे, मनसेचे महाराष्ट्र सैनिक अनिल पाथरवट, मनसेचे हर्षल पाटील, ग्याणु पाटील, निलेश महाजन, गणेश जाधव, गोविंदा पाटील, गोपाल चौधरी, प्रशांत पाटील, हणमंतखेडे सिम येथील सरपंच विनोद पाटील, उप सरपंच समाधान पवार, राज पाटील राकेश पाटील, शुभम पाटील, प्रमोद पाटील व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.